...तर महाविकास आघाडी सरकार ८ दिवसही टिकले नसते; सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2024 01:48 PM2024-03-01T13:48:58+5:302024-03-01T13:49:27+5:30

ज्या कालावधीत भाजपा-शिवसेना एकत्रित स्थापन करणार नाही अशी स्थिती झाली तेव्हा वेगवेगळे पर्याय आले असं सुनील तटकरेंनी म्हटलं.

If Ajit Pawar had not been made the Deputy CM, then Maha Vikas Aghadi government would not have lasted for even 8 days - Sunil Tatkare | ...तर महाविकास आघाडी सरकार ८ दिवसही टिकले नसते; सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट

...तर महाविकास आघाडी सरकार ८ दिवसही टिकले नसते; सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट

मुंबई - भाजपासोबतची चर्चा पक्ष नेतृत्वाच्या सांगण्यावरूनच झाली. १५-२० दिवसांत घडामोडी घडल्या. दिल्ली आणि मुंबईतल्या बैठकीत मी सहभागी होतो. सकाळच्या शपथविधीबाबत काळाच्या ओघात उत्तरे मिळतील. हल्ली अनेकजण स्वत:ला फार काही समजण्याच्या नावाखाली अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद दिले चूक झाली असं विधाने करतात. पण अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद दिले ही मेहरबानी नव्हती. अजितदादा उपमुख्यमंत्री नसते तर महाविकास आघाडीचे सरकार ८ दिवसही टिकले नसते असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी केला आहे.
 
सुनील तटकरे म्हणाले की, अजित पवारांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय आत्ताच घेतला नाही. तर २०१४ पासून पक्ष नेतृत्वाने याची सुरुवात केली होती. २०१४ ला भाजपाला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. पक्षात संघर्ष नव्हता. भाजपासोबत सरकारमध्ये जाण्याचा निर्णय सर्वोच्च स्तरावर झाला. २०१६-१७ मध्येही मी प्रदेशाध्यक्ष असताना भाजपासोबत जाण्याचा निर्णय झाला. जवळपास मंत्रिमंडळातील खाती ठरली होती, पालकमंत्रिपदे ठरली. लोकसभेच्या जागांचे वाटपही झाले होते असं तटकरेंनी सांगितले.  

तसेच काही कारणास्तव ती चर्चा पुढे गेली नाही. २०१९ ला विधानसभेच्या निवडणुकीचा स्पष्ट कौल भाजपा-शिवसेना युतीला मिळाला. १७६ जागांवर युती निवडून आली होती. आघाडीला १०० जागा मिळाल्या होत्या. जनतेचा कौल कुणी, कशाला आणि का नाकारला हे पाहा. त्यातूनच महाविकास आघाडी निर्माण झाली. त्यात देवेंद्र फडणवीस अजित पवारांचे काही तासांचे सरकार आले. ज्या कालावधीत भाजपा-शिवसेना एकत्रित स्थापन करणार नाही अशी स्थिती झाली तेव्हा वेगवेगळे पर्याय आले. त्यात २ पर्यात भाजपा-राष्ट्रवादी आणि दुसरी शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस असं होतं. एकाचवेळी आमची दोन्हीकडे चर्चा सुरू होती अशी माहिती तटकरेंनी दिली. टीव्ही ९ च्या मुलाखतीत ते बोलत होते. 

दरम्यान, आमदारांच्या मनात खदखद होती. अजितदादांनी घेतलेला निर्णय योग्यच होता असं वाटत होते. तीन पक्षांच्या सरकारऐवजी दोन पक्षाचे सरकार चांगले ठरले असते असं आमदारांच्या मनात होते. ज्यादिवशी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला हेड काऊंटने बहुमत चाचणी घ्या. हा निर्णय आला नसता तर कदाचित वेगळं काही घडले असते. जे घडू शकते याचा विचार करत पक्षनेतृत्वाने अजित पवारांना उपमुख्यमंत्री केले, ती मेहरबानी नव्हती तर पक्षाच्या अस्तित्वासाठी घेतलेली भूमिका होती असं सुनील तटकरे यांनी सांगितले. 

Web Title: If Ajit Pawar had not been made the Deputy CM, then Maha Vikas Aghadi government would not have lasted for even 8 days - Sunil Tatkare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.