ठाकरे गट भाजपाशी हातमिळवणी करणार? आदित्य-रश्मी ठाकरे मोदींना भेटलेत, शिंदे गटाच्या नेत्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 10:28 PM2024-03-05T22:28:52+5:302024-03-05T22:29:37+5:30

काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे दोघेजण दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून आले आहेत, असा खळबळजनक दावा शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. 

aaditya thackeray and rashmi thackeray meet pm narendra modi in delhi, claims shinde faction leader deepak kesarkar | ठाकरे गट भाजपाशी हातमिळवणी करणार? आदित्य-रश्मी ठाकरे मोदींना भेटलेत, शिंदे गटाच्या नेत्याचा दावा

ठाकरे गट भाजपाशी हातमिळवणी करणार? आदित्य-रश्मी ठाकरे मोदींना भेटलेत, शिंदे गटाच्या नेत्याचा दावा

मुंबई: राज्याच्या राजकारणात पुन्हा एक मोठा राजकीय भूकंप घडू शकतो. भाजपा आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा एकत्र येऊ शकतात, अशी शक्यता शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याने वर्तवली आहे. काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे दोघेजण दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून आले आहेत, असा खळबळजनक दावा शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. 

याबाबत बोलताना काही प्रसिद्धी माध्यमांनी अशा प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध केल्याची माहिती दिपक केसरकर यांनी दिली. ते म्हणाले आहे की, उद्धव ठाकरे यांनी दोनवेळा दिलेला शब्द फिरवला आहे. त्यामुळे आता त्यांना जवळ करायचे की नाही, हे पंतप्रधान मोदी यांनी स्वत:च ठरवावे. पण यानिमित्ताने ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा भाजपासोबत येण्याच्या हालचाली सुरु असल्याचे सिद्ध झाले आहे. तसेच, शिवसेना ठाकरे गट पुन्हा एकदा भाजपासोबत एनडीए आघाडीत आला तर राज्यातील राजकीय समीकरण बदलणार आहे, असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. 

"आदित्य आणि रश्मी ठाकरे दिल्लीला गेले होते, असे मी माध्यमांकडून ऐकले. त्यांनी भेट घेतली (पंतप्रधान मोदी यांची), मात्र ही भेट कुठल्या कारणासाठी होती? व्यक्तिगत कारणासाठी तर असू शकत नाही. म्हणून ही भेट कशासाठी होती", असे दीपक केसरकर म्हणाले. तसेच आदित्य आणि रश्मी ठाकरे यांनी पुन्हा भाजपशी हातमिळवणी करण्यासाठी भेट घेतली का? असा प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारला असता ते म्हणाले, ''ही भेट तर झाली आहे, हे वृत्तपत्रात छापून आलं आहे. यातच अशी जर भेट झाली असेल, तर कोणाच्याही मनात शंका येणं स्वाभाविक आहे.''

भाजपा पुन्हा ठाकरे यांना सोबत घेणार असे तुम्हाला वाटते का? असा प्रश्न त्यांना विचारला असता दीपक केसरकर म्हणाले, ''मला स्वतःला असं वाटतं नाही. मात्र ते प्रयत्न करत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. शिवसैनिकांनी आतातरी डोळे उघडले पाहिजेत. महायुती होणार होती. उद्धव ठाकरे दिल्लीत तसं ठरवूनही आले होते. पण, त्यांनी शब्द फिरवला. दोनवेळा शब्द फिरवल्यानंतर त्यांना आता जवळ येऊ द्यायचे की नाही, हा निर्णय आता पंतप्रधान मोदींनीच घ्यावा, असे दीपक केसरकर यांनी म्हटले.

Web Title: aaditya thackeray and rashmi thackeray meet pm narendra modi in delhi, claims shinde faction leader deepak kesarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.