निलंगा नगरपरिषदेच्या सभापतींच्या निवडी उत्साहात

By admin | Published: January 16, 2017 04:03 PM2017-01-16T16:03:50+5:302017-01-16T16:03:50+5:30

निलंगा नगरपालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतींची सोमवारी बिनविरोध निवड करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम

The selection of the Chairman of Nilanga Municipal Council | निलंगा नगरपरिषदेच्या सभापतींच्या निवडी उत्साहात

निलंगा नगरपरिषदेच्या सभापतींच्या निवडी उत्साहात

Next

ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 16 -  निलंगा नगरपालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतींची सोमवारी बिनविरोध निवड करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम सभापती इरफान सय्यद, पाणीपुरवठा हरिभाऊ कांबळे, नियोजन व विकास मनोज कोळ्ळे, आरोग्य सभापती म्हणून इशरत सौदागर, महिला बालकल्याण पद्मावती पोतदार, उपसभापती संपता नाटकर यांची निवड करण्यात आली आहे.
निलंगा पालिकेत बहुमत असलेल्या भाजपच्या सदस्यांची सोमवारी विषय समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाली. पीठासीन अधिकारी म्हणून डॉ. भगवान आगे होते. तहसीलदार विक्रम देशमुख, मुख्याधिकारी गणेश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. विषय समितीच्या सभापतींसाठी प्रत्येकी एक-एक अर्ज आल्याने बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. त्यात सार्वजनिक बांधकाम सभापती इरफान सय्यद, पाणीपुरवठा सभापती हरिभाऊ कांबळे, नियोजन व विकास इशरत सौदागर, महिला व बालकल्याण सभापती पद्मावती पोतदार, उपसभापती संपता नाटकर तर स्थायी समिती सदस्य म्हणून अशोक बाहेती यांची निवड करण्यात आली.
यावेळी गटनेते सुमनताई हाडोळे, नगरसेवक भगवान कांबळे, प्रदीप पाटील, शरद पेठकर, महादेव फहे, विष्णू ढेरे, स्मिता देशपांडे, शंकर भुरके, आशा माळी, महम्मदखां पठाण, विकास नाईकवाडे, सविता उजळे आदींची उपस्थिती होती. निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: The selection of the Chairman of Nilanga Municipal Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.