‘कोल्हापूर ब्रॅँड’ची चळवळ करा: ज्ञानेश्वर मुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 01:00 AM2018-11-12T01:00:14+5:302018-11-12T01:00:18+5:30

कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांच्या प्रोत्साहनामुळे कला, क्रीडा, संस्कृती, शेतीमध्ये कोल्हापूरने स्वत:चा ब्रॅँड तयार केला; पण दुर्दैवाने तो आपण ...

Move to Kolhapur brand: Dnyaneshwar Mulay | ‘कोल्हापूर ब्रॅँड’ची चळवळ करा: ज्ञानेश्वर मुळे

‘कोल्हापूर ब्रॅँड’ची चळवळ करा: ज्ञानेश्वर मुळे

Next

कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांच्या प्रोत्साहनामुळे कला, क्रीडा, संस्कृती, शेतीमध्ये कोल्हापूरने स्वत:चा ब्रॅँड तयार केला; पण दुर्दैवाने तो आपण टिकवू शकलो नाही. आताचा जमाना ब्रॅँडिंगचा आहे. यात टिकायचे तर पुन्हा एकदा ब्रॅँडिंगसाठी चळवळ हाती घ्यावी लागेल. ‘ब्रॅँड कोल्हापूर’ या उपक्रमाने त्या दिशेने पहिले पाऊल पडले आहे. याचे रूपांतर चळवळीत करून कोल्हापूरला गतवैभव मिळवून द्यावे, अशी अपेक्षा परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी व्यक्त केली. ब्रॅँडिंग न झाल्यानेच कोल्हापूरने राज्याला एकही मुख्यमंत्री दिला नाही, अशी खंतही मुळे यांनी बोलून दाखविली.
आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘ब्रॅँड कोल्हापूर’ या उपक्रमाची सुरुवात रविवारी हॉटेल सयाजी येथे झाली. कला, क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळ्यांवर कोल्हापूरचे नाव उज्ज्वल करणाऱ्या ४५ जणांचा सत्कार मुळे यांच्या हस्ते झाला.
सत्कारानंतर मार्गदर्शन करताना मुळे म्हणाले, देश आणि जागतिक पातळीवर कोल्हापूरला यशाची दीर्घ परंपरा आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कौतुक करण्याच्या आणि प्रोत्साहन देण्याच्या गुणांमुळे कोल्हापूरने स्वत:ची ओळख तयार केली; पण शाहू महाराजांसारखी गुणग्राहकता स्वातंत्र्योत्तर काळातील लोकप्रतिनिधींकडे राहिली नसल्यामुळे कोल्हापूरची ओळख मागे पडत गेली. नवीन बुद्धिमत्तेसाठी भरीव निधीची उभारणी केल्यास कोल्हापुरी ब्रॅँडला गतवैभव मिळेल, अशी आशा मुळे यांनी व्यक्त केली.
सतेज पाटील म्हणाले, जिद्द कर्तृत्वाच्या जोरावर स्वत:ची ओळख तयार करणाºया गुणवंतांना एका व्यासपीठावर आणून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. दरवर्षी दिवाळीला कौटुंबिक स्वरूपाचा हा सत्कार कार्यक्रम होणार आहे.
कोल्हापूरचे कर्तृत्व एका क्लिकवर
कोल्हापूरच्या मातीत वाढलेल्या आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या कर्तृत्वाचा झेंडा फडकविणाºयांची माहिती देण्यासाठी ‘ब्रॅँड कोल्हापूर’ या नावाच्या वेबसाईटचे यावेळी ज्ञानेश्वर मुळे, अनंत खासबारदार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. तसेच इन्फो ब्रॅँड, कोल्हापूर या नावाने ई-मेलही सुरू करण्यात आला आहे. यामुळे कोल्हापुरातील कर्तृत्ववानांची माहिती क्लिकवर मिळणार आहे.
४५ जणांच्या पाठीवर कौतुकाची थाप
दादू चौगले (कुस्ती), सुहास खामकर (शरीरसौष्ठव), ध्रुव मोहिते (कार रेसिंग), रेश्मा माने (कुस्ती), भूषण गांधी (उद्योजक), शाहू माने (नेमबाज), अहिल्या चव्हाण (जलतरण), अभिनंदन पाटील (संशोधक), प्रियंका पाटील (संशोधक), दीपक सावंत (संशोधक), चिदंबरम शिंदे (इको-फें्रडली पेन निर्मिती), आदिती गायकवाड (क्रिकेटर), स्वप्निल पाटील (जलतरण), अनुष्का पाटील (नेमबाजी), शरद बनसोडे (बास्केटबॉल कोच), मेधप्रणव पवार (शॉर्ट फिल्म), श्रेया देशपांडे (टेबल टेनिस), प्रेरणा आळवेकर (बॅडमिंटन), स्नेहल बेंडके (बास्केटबॉल रेफ्री), वीरधवल खाडे (जलतरण), राजमल्हार व्हटकर (वुशू), ऊर्मिला सुतार (साउंड इंजिनिअर), दुर्गाप्रसाद दासरी (शरीरसौष्ठव), संतोष मिठारी (क्रिकेटर), सोनल सावंत (पॉवर लिफ्टिंग), आदित्य अनगळ (तलवारबाजी), खुशी कांबोज (गिर्यारोहक), उत्कर्ष नलगे (कुस्ती), अनुजा पाटील (क्रिकेटर), निखिल कदम (फुटबॉल), अनिकेत जाधव (फुटबॉल), सुखदेव पाटील (फुटबॉल), चेतन चव्हाण, आशिष तंबाके, प्रदीप पाटील, धीरज रावळू, महेश मेथे, उदय पाटील, रौनक पाटील, आदित्य शिंदे, विजय कुलकर्णी, विनोद चंदवाणी, स्वप्निल माने, विशाल कोथळे, संदेश बागडी (सर्व आयर्नमॅन)

Web Title: Move to Kolhapur brand: Dnyaneshwar Mulay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.