पूर्व वैमन्स्यातून शाहूनगरमध्ये तरुणावर खूनी हल्ला, एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 01:49 PM2017-11-10T13:49:01+5:302017-11-10T14:01:14+5:30

शाहूनगर येथे पूर्व वैमन्स्यातून तरुणावर तलवारीने खूनी हल्ला केला. विशाल प्रकाश वडर (वय २०, रा. भाजी मार्केट समोर, शाहूनगर) असे जखमीचे नाव आहे. त्याच्या डोक्यात गंभीर वार झाल्याने खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी राजारामपूरी पोलीसांनी तिघांवर गुन्हा दाखल करुन संशयित गौरव अशोक भालकर (२७, रा. प्रतिभानगर) याला अटक केली.

The former Vamansi attacked the youth in Shanigar, and arrested one | पूर्व वैमन्स्यातून शाहूनगरमध्ये तरुणावर खूनी हल्ला, एकास अटक

पूर्व वैमन्स्यातून शाहूनगरमध्ये तरुणावर खूनी हल्ला, एकास अटक

Next
ठळक मुद्देशिवीगाळ करीत तलवार, बिअर बाटल्या, काठीने बेदम मारहाण डोक्यात, पाठिवर, पोटावर वार झाल्याने तरुण गंभीर जखमीराजारामपूरी पोलीसांत गुन्हा दाखल, तिन संशयित अटकेत

कोल्हापूर ,दि. १० : शाहूनगर येथे पूर्व वैमन्स्यातून तरुणावर तलवारीने खूनी हल्ला केला. विशाल प्रकाश वडर (वय २०, रा. भाजी मार्केट समोर, शाहूनगर) असे जखमीचे नाव आहे. त्याच्या डोक्यात गंभीर वार झाल्याने खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याप्रकरणी राजारामपूरी पोलीसांनी तिघांवर गुन्हा दाखल करुन संशयित गौरव अशोक भालकर (२७, रा. प्रतिभानगर) याला अटक केली. ही घटना गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. त्याचे अन्य दोन साथीदार धिरज देवकर (रा. राजेंद्रनगर) हे पसार आहेत.


अधिक माहिती अशी, विशाल वडर यांचे शाहूनगर येथे गाडा आहे. गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास गाडा बंद करुन तो घरी जात असताना पाथरवट गल्लीमध्ये दादा जगताप यांच्या पानपट्टीमध्ये सिगारेट घेतले. तेथून घरी जात असताना पाठिमागून दूचाकीवरुन आलेल्या गौरव भालकर, धिरज देवकर व आर. के गल्लीतील बुलेटवाला मित्र या तिघांनी शिवीगाळ करीत तलवार, बिअर बाटल्या व काठीने बेदम मारहाण केली.

डोक्यात, पाठिवर, पोटावर वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विशालला स्थानिक नागरिकांनी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृत्ती अत्यावस्थ बनल्याने त्याला राजारामपूरीतील खासगी रुग्णालयात हलविले. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलीसांनी गौरव भालकर याला अटक केली.

 

Web Title: The former Vamansi attacked the youth in Shanigar, and arrested one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.