कोल्हापूर पोलीस मुख्यालयात पोलीसांसाठी ओपन जीम, अभ्यासिकेचे उदघाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 12:51 PM2017-10-21T12:51:55+5:302017-10-21T13:08:04+5:30

समाजात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून समाजाला सुरक्षित वातावरण प्रदान करण्यासाठी पोलीस अहोरात्र झटत असतात. त्यांचे मनोबल व शारीरिक तंदुरुस्ती चांगली राहणे आवश्यक आहे. यादृष्टीने पोलीस मुख्यालयात सुरु करण्यात आलेल्या ओपन जीम व स्वामी विवेकानंद अभ्यासिकेचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.

Open Gym for the police, inauguration of the study room at the Kolhapur police headquarters | कोल्हापूर पोलीस मुख्यालयात पोलीसांसाठी ओपन जीम, अभ्यासिकेचे उदघाटन

कोल्हापूर पोलीस मुख्यालयात पोलीसांसाठी ओपन जीम, अभ्यासिकेचे उदघाटन

Next
ठळक मुद्देपालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते उदघाटन जिल्हा सर्व साधारण योजनेतून साडेतीन लाखांचा निधी पुस्तकांसाठी पोलीसांच्या पाल्यांसाठी सीबीएससी स्कुल तसेच दोन पेट्रोल पंप सुरु

कोल्हापूर , दि. २१ : समाजात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून समाजाला सुरक्षित वातावरण प्रदान करण्यासाठी पोलीस अहोरात्र झटत असतात. त्यांचे मनोबल व शारीरिक तंदुरुस्ती चांगली राहणे आवश्यक आहे. यादृष्टीने पोलीस मुख्यालयात सुरु करण्यात आलेल्या ओपन जीम व स्वामी विवेकानंद अभ्यासिकेचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.

कोणत्याही चांगल्या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही असे सांगून स्वामी विवेकानंद अभ्यासिकेसाठी जिल्हा सर्व साधारण योजनेतून साडेतीन लाखांचा निधी पुस्तकांसाठी उपलब्ध करुन दिला जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

पोलीस मुख्यालयात पोलीस व त्यांच्या कुटूंबियांसाठी 15 लाख रुपये खर्चुन उभारण्यात आलेल्या ओपन जीम व सुमारे साडेसात लाख रुपये खर्चुन तयार करण्यात आलेल्या स्वामी विवेकानंद अभ्यासिका उदघाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते झाले. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, पोलीस उप अधीक्षक सतीश माने यांच्यासह पोलीस विभागातील अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.


यावेळी ज्यांच्या जिवावर समाजात कायदा व सुव्यवस्था अबाधित असते ते पोलीस व त्यांचे कुटुंबिय यांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आपण प्रयत्नशिल आहोत असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोलीस व त्यांच्या कुटुंबियांनी या ओपन जीम व स्वामी विवेकानंद अभ्यासिकेचा जास्ती जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले.


विश्वास नांगरे-पाटील यांनी पोलीस कल्याणासाठी पालकमंत्री अत्यंत सकारात्मक असून स्वातंत्र्य पूर्वकाळातील पोलीस कॉटर्सची दुरुस्ती करुन त्यानी पोलीसांना राहण्या योग्य कॉटर्स उपलब्ध करुन दिल्याबद्दल आभार मानले.

लवकरच पोलीसांच्या पाल्यांसाठी सीबीएससी स्कुल तसेच दोन पेट्रोल पंप सुरु होतील व त्यातून पोलीस वेअरफेअरचे काम अधिक चांगल्या प्रकारे होईल असा विश्वास व्यक्त केला. संजय मोहिते यांनी पोलीस कर्मचारी व त्यांच्या पाल्यानी ओपन जीम व स्वामी विवेकानंद अभ्यासिकेचा लाभ घेवून प्रगती साध्य करावी, असे आवाहन केले.


यावेळी शहर पोलीस उप अधीक्षक प्रशांत अमृतकर, केएसबीपीचे सुजय पित्रे, पोलीस उप अधीक्षक सतीश माने, गांधीनगर पोलीस स्टेशन सहायक पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, राखीव पोलीस दलाचे वरेकर, आरएसपीचे राजू शिंदे यांचा पोलीस कल्याण निधीतून विविध कामे उत्कृष्ट केल्याबद्दल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
 

Web Title: Open Gym for the police, inauguration of the study room at the Kolhapur police headquarters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.