Kolhapur: खासगी बसच्या धडकेत वृद्ध महिला जागीच ठार, रस्ता ओंलाडताना घडली दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 12:01 PM2024-05-08T12:01:40+5:302024-05-08T12:02:53+5:30

राजेंद्र पाटील भोगावती : परिते (ता.करवीर) येथे अपघात होऊन अंजनी रंगराव पाटील (वय ७७) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. ...

A woman died on the spot in an accident at Parite kolhapur district | Kolhapur: खासगी बसच्या धडकेत वृद्ध महिला जागीच ठार, रस्ता ओंलाडताना घडली दुर्घटना

Kolhapur: खासगी बसच्या धडकेत वृद्ध महिला जागीच ठार, रस्ता ओंलाडताना घडली दुर्घटना

राजेंद्र पाटील

भोगावती : परिते (ता.करवीर) येथे अपघात होऊन अंजनी रंगराव पाटील (वय ७७) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. गावातील मुख्य प्रवेश दारावर आज, बुधवार सकाळी हा अपघात झाला. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाल्याने वाहतूक कोंडी झाली होती.

याबाबत अधिक माहिती अशी आहे, अंजनी पाटील या काही कामानिमित्त गावातील मुख्य प्रवेशद्वारा जवळील रस्ता पार करत होत्या. त्याच दरम्यान, कोल्हापूरकडून राधानगरीकडे वाहतूक करणाऱ्या लक्झरी बस (क्रमांक टी एस १२ यु इ ०३८२)ची जोरदार धडक होऊन गाडीच्या पुढील चाकाखाली सापडल्याने जागीच ठार झाल्या. अपघातात अंजनी यांच्या शरीराचे दोन तुकडे झाले होते. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. गावातील तरुणांनी तात्काळ एकेरी वाहतुकीचा मार्ग रिकामा करत वाहतूक सुरळीत केली. 

कोल्हापूर-राधानगरी ते फोंडा या मार्गाचे रुंदीकरण आणि डांबरीकरण होण्यासाठी आंदोलने करण्याची वेळ आल्यानंतर गेल्या वर्षी या रस्त्याचे काम झाल्यानंतर कोकण आणि गोवा जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. हा रस्ता दुरुस्ती नंतरचा हा पहिलाच अपघात आहे.

Web Title: A woman died on the spot in an accident at Parite kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.