वाडे येथे गुरुवारपासून शनैश्वर महाराज यात्रोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 10:32 PM2019-01-31T22:32:21+5:302019-01-31T22:32:44+5:30

३ रोजी कुस्त्यांची दंगल

Shaneshwar Maharaj Yatra | वाडे येथे गुरुवारपासून शनैश्वर महाराज यात्रोत्सव

वाडे येथे गुरुवारपासून शनैश्वर महाराज यात्रोत्सव

googlenewsNext

भडगाव : भडगाव तालुक्यातील वाडे येथील श्री शनैश्वर महाराज मंडळामार्फत श्री शनैश्वर महाराज यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या निमित्त १ ते ३ फेब्रुवारीयादरम्यान विविध कार्यक्रमांचे होणार आहे.
गिरणा नदीच्या काठावर भाविकांनी श्री शनैश्वर महाराजांचे भव्य मंदिर बांधले असून दरवर्षी येथे यात्रा भरते. यंदाही १ फेब्रुवारीपासून ही यात्रा भरणार असून मंदिरावर आकर्षक रोशणाईसह सजावट करण्यात आली आहे. यात्रोत्सवानिमितत दर्शनासाठी परिसरातील भाविकांची मोठी गर्दी होते. या सोबतच येथे पूजा, अर्चा नित्याने होत असते.
विविध कार्यक्रम
यात्रोत्सवानिमित्त १ ते ३ फेब्रुवारीदरम्यान धार्मिक कार्यक्रमांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात १ रोजी सकाळी ११ वाजता मंदिराजवळ महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. यावर्षी महाप्रसाद, अन्नदानाचे दातृत्व येथील गोरख महाजन, एकनाथ महाजन, काशिनाथ महाजन, बापू महाजन यांच्या परिवाराच्यावतीने करण्यात येणार आहे. रात्री ८ वाजता मंदिराजवळ चाळीसगावचे बाल कीर्तनकार हभप हरि महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. २ रोजी दुपारी ४ वाजता चौकातून श्री शनैश्वर महाराज मंदिरापर्र्यंत तगतरावाची मिरवणूक निघणार आहे. रात्री ९ वाजता माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात लोकनाट्याचा कार्यक्रम होणार आहे. ३ रोजी सकाळी ११ वाजेपासून मंदिरालगतच्या गिरणा नदीच्या पात्रात कुस्त्या होणार आहे.
यात्रोत्सवासह विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. शनैश्वर महाराज मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Shaneshwar Maharaj Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव