जोगलादेवी बंधाऱ्यात पाणी पोहोचले, मंगरूळला प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 12:48 AM2018-12-03T00:48:50+5:302018-12-03T00:48:59+5:30

जायकवाडी पाटबंधारे विभागाने डाव्या कालव्यातून गोदावरी वरील जोगलादेवी बंधा-यासाठी सोडण्यात आलेले १३ द. ल. घ. मीटर पाण्यापैकी ८ द. ल. घ. मीटर पाणी पोहोचले असून १२ टक्के पाणीसाठा झाला

Water reached the Jogaladevi Bandh, waiting for Mangrul | जोगलादेवी बंधाऱ्यात पाणी पोहोचले, मंगरूळला प्रतीक्षा

जोगलादेवी बंधाऱ्यात पाणी पोहोचले, मंगरूळला प्रतीक्षा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
तीर्थपुरी : जायकवाडी पाटबंधारे विभागाने डाव्या कालव्यातून गोदावरी वरील जोगलादेवी बंधा-यासाठी सोडण्यात आलेले १३ द. ल. घ. मीटर पाण्यापैकी ८ द. ल. घ. मीटर पाणी पोहोचले असून १२ टक्के पाणीसाठा झाला आहे. तर मंगरूळ बंधा-यासाठी जे पाणी सोडले ते पोहोचण्यापूर्वीच कॅनोलमधून येणारे पाणी बंद झाल्याने मंगरूळ परिसरातील शेतक-यांमध्ये नाराजी पसरली असून, पुन्हा पाणी सोडण्याची मागणी या भागातील शेतक-यांनी केली आहे.
गोदावरी नदीपात्रात जोगलादेवी बंधा-या अंतर्गत जोगलादेवी साडेगाव, भोगलगाव, इंदलगाव, चिंचोली हसनापूर गोंदी, गंगा चिंचोली, पाथरवाला, बोरगाववाडी इ. १४ गावे येत असून १०८3 हेक्टर शेती सिंचनाखाली येऊन १३ गावाला पाणीपुरवठा होतो. या बंधा-याची पाणी क्षमता मोठी आहे, असे असताना पाटबंधारे खात्याने डाव्या कालव्यातून सीआरफ ५३ मधून करंजळा येथून गल्हाटी नदीतून पाणी सोडले. कॅनल ते बांधारा ९ किलोमीटरचे अंतर पार करून १३ द. ल . घ.मी. पाणी सोडले. त्यातील बंधा-यात प्रत्यक्षात केवळ ८ द. ल. घ. मीटर पाणी पोहोचले आहे. त्यातून १२ टक्के पाणीसाठा साठल्याची माहिती उपअभियंता प्रशांत देशपांडे यांनी सांगीतले.
गोदावरी वरील मंगरूळ बंधा-याची क्षमता २५ द. ल. घ. मी. असून या बंधा-या अंतर्गतही १४ गावे येतात . त्यात मंगरूळ, रामसगाव, बानेगोव, राहेरी, जोगलादेवी, शेवता, भोगगाव, राजापूर, गंगावाडी, बोरगाव, मनबाई - जवळा, सौदींगाव यांचा समावेश असून, ३९६७ हेक्टर जमीन सिंचनाखाली येते. असे असताना जोगलादेवी बंधा-यातून ५ द. ल. घ. मी. पाणी सोडले जोगलादेवी ते मंगरूळ बंधारा १८ कि.मि. अंतर पाणी गोदावरी पात्रातच अडकले. ते बंधा-यात पोहोचण्यापूर्वी कॅनलचे पाणी बंद झाले त्यामुळे त्या बंधा-यात पाणीच पोहोचले नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

Web Title: Water reached the Jogaladevi Bandh, waiting for Mangrul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.