'तोंड काळ करायला ये पुढ पटकन...';दुष्काळ पाहणी दौऱ्यात पालकमंत्री लोणीकरांची जीभ घसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 06:06 PM2019-05-14T18:06:50+5:302019-05-14T18:43:34+5:30

कृषी सहायकाशी बोलतांना केला अभद्र भाषेचा वापर

Guardian Minister Lonikar's uses abusive language during drought visit tour in Jalana | 'तोंड काळ करायला ये पुढ पटकन...';दुष्काळ पाहणी दौऱ्यात पालकमंत्री लोणीकरांची जीभ घसरली

'तोंड काळ करायला ये पुढ पटकन...';दुष्काळ पाहणी दौऱ्यात पालकमंत्री लोणीकरांची जीभ घसरली

Next
ठळक मुद्देदौऱ्यात मंत्री लोणीकर यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला,अडवणूक होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी यावेळी केल्या. 

तळणी (जालना ) : ये तोंड काळ करायला ये लवकर पटकन पुढं, नाव घेतलं तर पटकन यायचं ना ...! असं म्हणत पालकमंत्री बबनराव लोणीकरांनी कृषी पर्यवेक्षकला तोंड काळ करण्याची अभद्र भाषा वापरली. मंठा तालुक्यातील शिवनगिरी येथे दुष्काळ पाहणी दौऱ्या दरम्यान हे घडले. 

राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी मंठा तालुक्यातील शिवनगिरी येथे दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. या दुष्काळी पाहणीत नागरिकांनी गावात तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, कृषीसेवक, आरोग्यसेवक, लाईनमन हे महिना- महिना येत नसल्याचा तक्रारी पालकमंत्र्याकडे केल्या. मतदारसंघात सरकारी कर्मचारी व अधिका-यांवर सत्ताधाऱ्यांचा अंकुश राहीला नसून राष्ट्रीयकृत बँकेतही सर्वसामान्यांची अडवणूक होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी यावेळी केल्या. 

दरम्यान, दौऱ्यात मंत्री लोणीकर यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला, गावात नागरिकांना पाणी , जनावरांना चारा व मजुरांना काम मिळाले नाही तर संबंधित कर्मचारी अधिकाऱ्यावर कारवाई होईल, नागरिकांनी दुष्काळात घाबरून जाण्याचे कारण नाही. यावर्षी चांगला पाऊस व चांगले पीक येईल. असे म्हणत मंत्री लोणिकरांकडून उपस्थित शासकीय कर्मचाऱ्यात कृषी अधिकाऱ्याची  विचारणा  केली असता, उपस्थित असलेल्या कृषी पर्यवेक्षक दादासाहेब तुपे यांना उद्देशून चक्क तोंड काळ करण्याची अभ्रद भाषा केली. यावेळी भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

मी ऐकलेच नाही- तुपे
याबाबत कृषी पर्यवेक्षक दादासाहेब तुपे यांना विचारले असता, मी तिथेच थोडा पाठीमागे उभा होतो. मंत्री महोदयांनी कृषीचे कोण आहेत. अशी विचारणा केल्यानंतर मी पुढे आलो व परिचय दिला. ते मला काय बोलले मी ऐकलेच नसल्याचे तुपे म्हणाले.

Web Title: Guardian Minister Lonikar's uses abusive language during drought visit tour in Jalana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.