TikTok प्रकरणी भारताच्या पावलावर पाऊल ठेवणार अमेरिका; चीनला अद्दल घडवण्याची तयारी!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 03:05 PM2024-03-07T15:05:26+5:302024-03-07T15:06:27+5:30

अमेरिकेत टिकटॉकवर बंदी घालण्याची मागणी होण्याची ही पहिलीच वेळ नाही

US bill would ban TikTok from app stores unless ByteDance divests it after India slamming App | TikTok प्रकरणी भारताच्या पावलावर पाऊल ठेवणार अमेरिका; चीनला अद्दल घडवण्याची तयारी!

TikTok प्रकरणी भारताच्या पावलावर पाऊल ठेवणार अमेरिका; चीनला अद्दल घडवण्याची तयारी!

TikTok Ban in US after India: भारताचेचीनसोबतचे राजकीय संबंध तणावाचे झाल्यानंतर, २०२०मध्ये भारताने चिनी अ‍ॅप टिक-टॉकवर बंदी घातली होती. आता अमेरिकेतही या अ‍ॅपवर बंदी घालण्याची मागणी होत आहे. मंगळवारी अमेरिकन संसदेत खासदारांनी मांडलेल्या विधेयकात चिनी कंपनी टिकटॉक अ‍ॅपवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. 'द प्रोटेक्टिंग अमेरिकन्स फ्रॉम फॉरेन ॲडव्हर्सरी कंट्रोल्ड ॲप्लिकेशन्स अ‍ॅक्ट'मध्ये कंपनीवर चिनी कम्युनिस्ट पक्षाशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे आणि अ‍ॅपमुळे देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका असल्याचा दावा करण्यात आला आहे.

हाऊस सिलेक्ट कमिटीचे अध्यक्ष आणि कायद्याच्या लेखकांपैकी एक, माईक गॅलाघर यांनी कंपनीला एका प्रेस स्टेटमेंटमध्ये इशारा दिला की, हा माझा TikTok ला संदेश आहे, CCP (चीनी कम्युनिस्ट पार्टी) सोबत संबंध तोडा किंवा तुमचा अमेरिकेतील व्यवसाय बंद करा! अमेरिकेतील एका मोठ्या मीडिया प्लॅटफॉर्मवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार आम्ही अमेरिकेच्या सर्वात मोठ्या प्रतिस्पर्ध्याला देऊ शकत नाही, असेही त्यांनी नमूद केले.

संसदेत सादर केलेल्या विधेयकात टिक-टॉकचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. परंतु हे विधेयक अमेरिकेच्या शत्रू देशांच्या नियंत्रणाखाली असलेल्या प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यासाठी एक व्यापक फ्रेमवर्क तयार करते. वॉशिंग्टनने शत्रू देश म्हणून लेबल केलेल्या देशांमध्ये चीन, रशिया, इराण, उत्तर कोरिया आणि व्हेनेझुएला यांचा समावेश आहे.

कृष्णमूर्ती, ज्यांनी हे विधेयक सादर केले, त्यापैकी एक, म्हणाले की, रशिया असो किंवा सीसीपी, हे विधेयक हे सुनिश्चित करते की राष्ट्रपतींना धोकादायक अ‍ॅपवर कारवाई करण्याचा आणि आमच्या प्रतिस्पर्ध्यांविरूद्ध अमेरिकन लोकांची सुरक्षा आणि गोपनीयतेचे रक्षण करण्याचा अधिकार आहे. अमेरिकेत जर हे विधेयक मंजूर झाले, तर ByteDance कडे TikTok विकण्यासाठी फक्त ५ महिने असतील. जर कंपनी तसे करू शकली नाही तर ते अमेरिकेतील Apple Store आणि Google Play Store वरून काढून टाकले जाईल.

अमेरिकेत टिकटॉकवर बंदी घालण्याची मागणी होण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी एका रिपब्लिकन पक्षाने आणलेल्या विधेयकात टिकटॉकवर पूर्णपणे बंदी घालण्याचा प्रयत्न केला होता, याशिवाय सिनेटरने एक कायदाही आणला होता, मात्र दोन्ही विधेयके मंजूर होऊ शकली नाहीत.

Web Title: US bill would ban TikTok from app stores unless ByteDance divests it after India slamming App

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.