अॅपलचे मुख्याधिकारी म्हणतात, मी समलिंगी

By admin | Published: October 31, 2014 01:05 AM2014-10-31T01:05:51+5:302014-10-31T01:05:51+5:30

अॅपल या प्रसिद्ध कंपनीचे मुख्याधिकारी टॉम कुक यांनी आपण समलिंगी असल्याची जाहीर कबुली दिली असून, समलिंगी असण्याचा आपल्याला अभिमान आहे, असे म्हटले आहे.

Apple's chief executive says, I am gay | अॅपलचे मुख्याधिकारी म्हणतात, मी समलिंगी

अॅपलचे मुख्याधिकारी म्हणतात, मी समलिंगी

Next
वॉशिंग्टन : अॅपल या प्रसिद्ध कंपनीचे मुख्याधिकारी टॉम कुक यांनी आपण समलिंगी असल्याची जाहीर कबुली दिली असून, समलिंगी असण्याचा आपल्याला अभिमान आहे, असे म्हटले आहे. ब्लूमबर्ग बिझनेसमध्ये त्यांनी एक लेख लिहिला असून, आपण गे असल्याचे त्यात जाहीर केले आहे. ज्यांना आपण समलिंगी असल्याचे कबूल करणो अवघड जाते अशा व्यक्तींना समर्थन देण्यासाठी आपण ही कबुली देत आहोत असे त्यांनी म्हटले आहे. 
गे असण्याचा मला अभिमान आहे, एवढेच नाही तर देवाने मला दिलेली ही सर्वात मोठी भेट आहे असे मला वाटते असे टॉम कुक यांनी या लेखात म्हटले आहे. या जाहीर कबुलीनंतर टि¦टरवर कुक यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. (वृत्तसंस्था)

 

Web Title: Apple's chief executive says, I am gay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.