काँग्रेसच देऊ शकते शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 09:34 PM2019-06-22T21:34:50+5:302019-06-22T21:35:18+5:30

राज्यातील विद्यमान भाजप सरकारने कर्जमाफीची घोषणा करुन दोन वर्षांचा काळ लोटला.मात्र अद्यापही पूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. परिणामी हजारो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. भाजप सरकार केवळ घोषणाबाज सरकार आहे.

Congress can give huge debt relief to farmers | काँग्रेसच देऊ शकते शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी

काँग्रेसच देऊ शकते शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी

Next
ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल । मोरवाही येथे प्रचार सभा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्यातील विद्यमान भाजप सरकारने कर्जमाफीची घोषणा करुन दोन वर्षांचा काळ लोटला.मात्र अद्यापही पूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. परिणामी हजारो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. भाजप सरकार केवळ घोषणाबाज सरकार आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी केवळ काँग्रेस सरकारच देऊ शकते असे प्रतिपादन आ.गोपालदास अग्रवाल यांनी केले.
आसोली जि.प.पोटनिवडणुकीकरिता आघाडीचे उमेदवार सुरजलाल महारवाडे यांच्या निवडणूक प्रचारार्थ शुक्रवारी मोरवाही येथे आयोजित प्रचारसभे ते बोलत होते. या वेळी जि.प.सभापती रमेश अंबुले, पं.स.सभापती माधुरी हरिणखेडे, चमन बिसेन, हरिभाऊ कावळे, बंटी भेलावे, सरपंच उर्मिला महारवाडे, भोजराज चुटे, अनिता शिवणकर, रामदास गणविर, सुरेश चुटे, प्रतिमा कांबळे, सविता कावडे, सुरेखा डोंगरे, छाया चुटे, छाया शिवणकर, विजय पाथोडे, शिवशंकर हुमने, भुमेश चौरे, अनंतराम पाथोडे, गणपत पाथोडे, देवानंद कावडे, महेंद्र कोरे सेवंतबाई हेमने, शाम हेमने, कातांबाई भांडारकर, धनलाल गौतम, विनोद ठाकूर, योगराज रिनाईत, मोरोती हेमने, इंदूबाई ठाकूर, कविता कावळे उपस्थित होते.
आ.अग्रवाल म्हणाले गोंदिया जि.प.आणि पंचायत समितीमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. आसोली जि.प.क्षेत्रातून काँग्रेसचे शेखर पटले हे निवडून आले होते. मात्र त्यांचे निधन झाल्याने येथे पोटनिवडणूक होत आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादाच्या मुद्दावर जनतेची दिशाभूल करुन सत्ता स्थापन केली. मात्र अद्यापही २०१७ मधील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. २० हजाराहून अधिक घरकुल लाभार्थी घरकुलाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे भाजप सरकारने दिलेली सर्व आश्वासन फोल ठरत आहेत. जनतेने अशा विश्वासघाती सरकारपासून सावध राहण्याचे आवाहन केले. काँग्रेस सरकारच्या काळात सर्वाधिक विकास कामे झाले असे सांगितले. या वेळी उपस्थित अन्य मान्यवरांनी सुध्दा मार्गदर्शन केले.

Web Title: Congress can give huge debt relief to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.