बस अपघातात बापलेक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 12:50 AM2018-02-28T00:50:28+5:302018-02-28T00:50:28+5:30

राज्य परिवहन महामंडळाच्या बसने धडक दिल्याने बापलेक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास पलसगड वळणावर घडली.

Bapelke injured in bus accident | बस अपघातात बापलेक जखमी

बस अपघातात बापलेक जखमी

Next
ठळक मुद्देपलसगड वळणावर घटना : जिल्हा रूग्णालयात भरती

ऑनलाईन लोकमत
कुरखेडा : राज्य परिवहन महामंडळाच्या बसने धडक दिल्याने बापलेक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास पलसगड वळणावर घडली.
लहानू जानू ठलाल (५५), प्रदीप लहानू ठलाल रा. घाटी, ता. कुरखेडा असे जखमी झालेल्या बापलेकांची नावे आहेत. दोघेही दुचाकी वाहनाने खेडेगाव येथील मंडई पाहून कुरखेडाकडे परत येत होते. दरम्यान पलसगड वळणावर विरूध्द दिशेने येणाऱ्या कुरखेडा-अंतरगाव या बसने दुचाकीला धडक दिली. धडकेमुळे बापलेक दुचाकीवरून खाली कोसळले. दोघांनाही गंभीर मार लागला आहे. त्यांना तत्काळ उपजिल्हा रूग्णालयात भरती केले आहेत.
मात्र प्रकृती गंभीर असल्याने दोघांनाही गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयात भरती केले आहे. दोघांच्या डोक्याला मार लागला आहे.

Web Title: Bapelke injured in bus accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात