धुळे प्रांतांकडून २९ जणांवर हद्दपारीची कारवाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 12:47 PM2018-01-13T12:47:42+5:302018-01-13T12:48:15+5:30

तात्काळ अंमलबजावणीचे आदेश : पोलीस ठाण्यांकडून होता प्रस्ताव

Deportation proceedings to 29 people from Dhule provinces! | धुळे प्रांतांकडून २९ जणांवर हद्दपारीची कारवाई!

धुळे प्रांतांकडून २९ जणांवर हद्दपारीची कारवाई!

Next
ठळक मुद्देधुळे प्रांताधिकारी यांची कारवाई२९ जण झाले हद्दपारगुंडावर बसविला वचक

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : सर्वसामान्य नागरिकांसह प्रशासनाला त्रासदायक ठरणाºया २९ जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली़ जिल्ह्यातील संबंधित पोलीस ठाण्यांकडून दाखल प्रस्तावावर प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी शिक्कामोर्तब लावला़ 
३ महिन्यांकरीता कारवाई
३ महिन्यांच्या मुदतीकरीता धुळे जिल्ह्याच्या हद्दीतून निहाल पारस परदेशी, विजय आसाराम फुलपगारे तर धुळे तालुक्याच्या हद्दीतून मेहुल दत्तात्रय चत्रे, मलिक उर्फ मनोहर गंभीर बैसाणे, विक्की उर्फ विक्रम श्याम गोयर यांचा समावेश आहे़ 
४ महिन्यांकरीता कारवाई
४ महिन्यांच्या मुदतीकरीता दोन जणांना हद्दपार करण्यात आले़ यात संतोष रविंद्र परदेशी आणि विक्की उर्फ विक्रम महादेव परदेशी यांचा समावेश आहे़ या दोघांना धुळे जिल्ह्यासह जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, पारोळा आणि नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुका अशा भागातून हद्दपार केले आहे़ 
६ महिन्यांकरीता कारवाई
६ महिन्यांच्या मुदतीकरीता धुळे जिल्ह्याच्या हद्दीतून दिनेश प्रताप भोई तसेच धुळे जिल्ह्यासह जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, पारोळा या क्षेत्रातून जाकीर शाह बशीर शाह उर्फ मुल्ला तर धुळे जिल्ह्यासह जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, पारोळा तसेच नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातून बबलू उर्फ राहूल भरत खरात, प्रमोद सिताराम महिराळे, शक्ती रमेश अकवारे, रवी पन्नालाल चत्रे, गोविंद मैकुलाल चित्ते, आकाश उमेश पानथरे यांना हद्दपार करण्यात आले आहे़ 
१ वर्षाकरीता कारवाई
१ वर्षाच्या मुदतीकरीता १० जणांना हद्दपार करण्यात आले़ धुळे जिल्ह्यातून विक्की उर्फ चेतन सुनील दाभाडे, निलेश उर्फ बाल्या विलास मराठे, भुषण राजेंद्र माळी तर धुळे जिल्ह्यासह जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, पारोळा आणि नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुका क्षेत्रातून प्रतिक उर्फ मल्या प्रकाश बडगुजर, यशवंत सुरेश बागुल, पवन उर्फ भुºया दिलीप वाघ, वसीम जैनोद्दीन शेख, सुनील रामू मरसाळे, विरेंद्र चंद्रभान अहिरे, प्रविण उर्फ बंटी नाना पाटील यांचा समावेश आहे़ 
२ वर्षाकरीता कारवाई
२ वर्षांच्या मुदतीकरीता ४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे़ त्यात धुळे जिल्ह्याच्या हद्दीतून सोपान छगन पाटील याला हद्दपार केले आहे़ तर धुळे जिल्ह्यासह जळगाव, नाशिक आणि नंदुरबार जिल्ह्यातून गणेश रविंद्र सुर्यवंशी, बंटी उर्फ रामदास अण्णा गायकवाड (गुरुपपैय्या), मिलींद राजेंद्र आवटे यांचा समावेश आहे़ 

Web Title: Deportation proceedings to 29 people from Dhule provinces!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.