ट्रकने ब्रेक दाबल्याने बोरेलो धडकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 11:52 AM2018-02-24T11:52:11+5:302018-02-24T11:52:11+5:30

वरखेडे फाटा : सुदैवाने जीवितहानी टळली

Borla hit the truck by pressing the brakes | ट्रकने ब्रेक दाबल्याने बोरेलो धडकली

ट्रकने ब्रेक दाबल्याने बोरेलो धडकली

Next
ठळक मुद्देमुंबई आग्रा महामार्गावरील घटनासुदैवाने जीवितहानी टळलीअपघातस्थळी नागरिकांची गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरानजिक मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वरखेडे फाट्याजवळ ट्रकला मागून चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली़ यात वाहनाचे नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी टळली़ अपघाताची ही घटना शुक्रवारी दुपारी घडली़ 
एपी ३१ टीडी १८८९ क्रमांकाचा ट्रक सोनगीरकडून धुळे शहराकडे येत होता़ शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वरखेडे फाट्याजवळ हा अपघात घडला़ ट्रक वेगाने जात असताना ट्रकचालकाने अचानक ब्रेक दाबला़ ट्रक मागे असलेले चार चाकी वाहन देखील वेगात असल्यामुळे वाहनचालक वेगावर नियंत्रण मिळवू शकला नाही़ परिणामी ट्रकच्या मागील बाजूस वाहनाची जोरदार धडक बसली़ या अपघातात दोन जणं जबर जखमी झाले़ त्यात साब शिवराम सना पुल राव (रा़ गुंटूर, जि़ कृष्णा, आंध्रप्रदेश) यांच्यासह अन्य एकाचा समावेश आहे़ 
घटना घडल्यानंतर तातडीने जखमींना वैद्यकीय उपचारासाठी भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले़ जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ 

Web Title: Borla hit the truck by pressing the brakes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.