वालचंदनगर सहकारी बँकेचे पाच संचालक अपात्र 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 06:40 PM2018-10-26T18:40:35+5:302018-10-26T18:54:45+5:30

वालचंदनगर सहकारी बँकेचे पाच संचालकावर बँकेची अनामत रक्कम कर्ज भरण्यासाठी वापरल्याप्रकरणी अपात्रतेचा बडगा उगारला असुन त्यांचे संचालक पद रद्द करण्यात आले आहे.

Five directors of Walchandnagar Sahakari Bank are ineligible | वालचंदनगर सहकारी बँकेचे पाच संचालक अपात्र 

वालचंदनगर सहकारी बँकेचे पाच संचालक अपात्र 

Next
ठळक मुद्देपाच संचालकांनी वेळोवळी बँकेकडून अनामत रक्कम घेतल्याचे निष्पन्नमहाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० नूसार संचालक मंडळावर कारवाईचा बडगा बँकेचे विद्यमान उपाध्यक्षाचाही समावेश

वालचंदनगर: वालचंदनगर येथील (ता.इंदापूर) सहकारी बँकेचे पाच संचालकावर बँकेची अनामत रक्कम कर्ज भरण्यासाठी वापरल्याप्रकरणी अपात्रतेचा बडगा उगारला आला आहे. तसेच त्यांचे संचालक पद रद्द करण्याचा आदेश जिल्हा उपनिबंधक आनंद कटके यांनी दिला आहे. यामध्ये बँकेचे विद्यमान उपाध्यक्षाचाही समावेश आहे.
यामध्ये बँकेचे उपाध्यक्ष सतीश मच्छिंद्र कसबे, संचालक अरविंद महादेव अंबुदरे, पंकज मच्छिंद्र जाधव, गोरख सदाशिव जामदार, नवनाथ आण्णासो पांढरमिसे यांचा समावेश असुन याप्रकरणी बँकेचे संचालक संतोष वामन देवरे यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे बँकेची अनामत रक्कम संचालकांनी वापरल्याची तक्रार दाखल केली होती.  यासंदर्भात जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने चौकशी केल्यानंतर वरील पाच संचालकांनी वेळोवळी बँकेकडून अनामत रक्कम घेतल्याचे निष्पन्न झाले होते.  तसेच अनामत रक्कमेचा विनियोग  बँकेच्या कामासाठी न करता स्वत:ची कर्ज भरण्यासाठी केला असल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हा उपनिबधंक कटके यांनी बँकेच्या अनामत रक्कमेचा दुरुउपयोग केल्याप्रकरणी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० नूसार संचालक मंडळावर कारवाईचा बडगा उभारला असुन पाचही संचालकांना अपात्र ठरविले असल्याचे आदेश दिला आहे. वालचंदनगर सहकारी बँकेचे संचालक मंडळ १५ सदस्यांचे असुन पाच संचालक अपात्र झाल्याने दहा संचालक कार्यरत आहेत.यामध्ये सत्ताधारी पॅनेलचे पाच व विरोधी पॅनेलचे पाच संचालक आहेत.
---

Web Title: Five directors of Walchandnagar Sahakari Bank are ineligible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.