शिक्षिकेच्या नावे बनावट इन्स्टाग्राम खाते तयार करून बदनामी; राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद

By उद्धव गोडसे | Published: March 31, 2024 01:20 PM2024-03-31T13:20:56+5:302024-03-31T13:21:27+5:30

अज्ञातावर गुन्हा, बनावट खाती तयार करणाऱ्या संशयितांचा पोलिसांकडून शोध सुरू

A complaint has been filed in the Rajarampuri police station for defamation by creating a fake Instagram account in the name of the teacher | शिक्षिकेच्या नावे बनावट इन्स्टाग्राम खाते तयार करून बदनामी; राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद

शिक्षिकेच्या नावे बनावट इन्स्टाग्राम खाते तयार करून बदनामी; राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद

उद्धव गोडसे, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर: शहरातील एका शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षिकेचे बनावट इन्स्टाग्राम खाते तयार करून त्यावरून विद्यार्थ्यांना अश्लील मेसेज पाठवल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत पीडित शिक्षिकेने राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. बनावट खाती तयार करणाऱ्या संशयितांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अज्ञाताने एका शिक्षिकेच्या नावाने इन्स्टाग्रामवर चार बनावट खाती तयार केली. त्यावरून विद्यार्थ्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्या. त्यानंतर एडिट केलेले अश्लील व्हिडिओ, फोटो पाठवून घाणेरड्या शब्दात मेसेज लिहिले. हा प्रकार २५ ते २८ मार्च दरम्यान घडला. थेट शिक्षिकेच्या खात्यावरून अश्लील मेसेज आल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये खळबळ उडाली. आपल्या नावाने बनावट खाती तयार करून बदनामी केल्याचा प्रकार लक्षात येताच पीडित शिक्षिकेने राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला.

सायबर पोलिस ठाण्याची मदत घेऊन बनावट खाती तयार करणा-या संशयितांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी सांगितले.

Web Title: A complaint has been filed in the Rajarampuri police station for defamation by creating a fake Instagram account in the name of the teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.