व-हाडाच्या लक्झरी बसची ट्रकला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 01:03 AM2018-05-12T01:03:36+5:302018-05-12T01:03:57+5:30

३० जण जखमी : नागपूर -मुंबई महामार्गावरील दुर्घटना; जखमी जिंतूर तालुक्यातील

 Truck-bound luxury bus of Wa-Hada | व-हाडाच्या लक्झरी बसची ट्रकला धडक

व-हाडाच्या लक्झरी बसची ट्रकला धडक

googlenewsNext

वैजापूर : लग्नाचे वºहाड घेऊन जाणाऱ्या लक्झरी बस व ट्रकची समोरासमोर धडक होऊन ३० जण जखमी झाले. यात १३ महिलांचा समावेश असून ट्रकचालकही गंभीर जखमी आहे. ही दुर्घटना शुक्रवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास नागपूर -मुंबई महामार्गावरील तिडी गावाजवळ घडली. वºहाडातील ३० जखमी जिंतूर तालुक्यातील रहिवासी आहेत.
मद्यधुंद टेम्पोचालकाने दहा ते बारा जणांना जखमी केल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी सकाळी मद्यधुंद लक्झरी बसचालकाने लग्नाच्या वºहाडाचा जीव धोक्यात घातला. जखमींवर वैजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करुन काहींना सुटी देण्यात आली तर काहींना पुढील उपचारासाठी नाशिकला पाठविण्यात आले. अपघात झाल्यानंतर बसचालक फरार झाला.
जिंतूर तालुक्यातील कावी येथून लग्नाचे वºहाड घेऊन लक्झरी बस (एमएच २२ एफ २२२१) नाशिककडे निघाली होती. तिडी गावाजवळ आल्यानंतर दारुच्या नशेत असलेल्या बस चालकाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केल्याने औरंगाबादच्या दिशेने जाणाºया ट्रकला (एमएच १८ सी ७६५२) या बसची जोराची धडक बसली. या धडकेत ट्रकच्या समोरच्या भागाचा चेंदामेंदा झाला. अपघात झाल्यानंतर बस चालकाने धूम ठोकली. मात्र नागरिकांनी क्लिनरला चोप देण्यास सुरुवात केली. बसचालकासोबतच क्लिनरनेसुद्धा दारु पिली होती, असे येथील नागरिकांनी सांगितले.
वैजापूर पोलीस ठाण्याचे सपोनि. रामहरी जाधव, पोलीस उपनिरीक्षक मोरे यांच्यासह अन्य पोलिसांनी घटधास्थळी धाव घेतली. क्लिनरला नागरिकांच्या तावडीतून सोडवून जखमींना ताबडतोब वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. के. मुंढे व डॉ. काथार यांनी प्रथमोपचार केले. ट्रकचालक विकास त्र्यंबक तांबे (५०, रा. नाशिक) यांना पुढील उपचारासाठी नाशिकला हलविण्यात आले आहे. याप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.
जखमींची नावे
चंद्रकला विठ्ठल शिंदे (४०), पेरुबाई सखा पवार (६५), लताबाई गंगाराम शिंदे (४५), गंगूबाई बाबूराव शिंदे (६०), शांताबाई अप्पा शिंदे (६५), सखा मारुती पवार (६५), राहुल अप्पा शिंदे (१८), दीपक विलास फुलारे (१०), लक्ष्मण सखा पवार (३२), फुलाबाई साहेबराव गुंजाळ (४०), पांडुरंग सावळा शिंदे (४०), चंदू सुखदेव शिंदे (३२), गंगाराम गोविंदा शिंदे (६५), अरुण भुजंग शिंदे (१३), मुकुंदा सावळा पवार (७०), प्रकाश गोविंद पवार (४०), जयंत तुळशीराम पवार (४), तुळशीराम मुकुंदा पवार (४५), यशोदा पांडुरंग शिंदे (४०), मंगल प्रकाश शिंदे (३०), गयाबाई सुखदेव शिंदे (७०), किशोर संतोष पवार (१६), गंगाबाई विठ्ठल पवार (३०), संतोष मुकिंदा पवार (५०), लिलाबाई शंकर शिंदे (४५), वैष्णवी विलास फुलारे (१०), फुलाबाई तुळशीराम पवार (३५, सर्व रा. कावी ता. जिंतूर), गोपी शंकर अजाबे (५६, रा. वैतरणा, नाशिक), राजू रामराव शेटे (३८, रा. हिवरखेडा, जिंतूर).
 

Web Title:  Truck-bound luxury bus of Wa-Hada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.