सिल्लोड तालुक्याची तहान वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 01:31 AM2018-05-16T01:31:14+5:302018-05-16T01:31:32+5:30

९९ गावांत ‘पाणीबाणी’: वाढत्या तापमानामुळे टंचाईच्या झळाही तीव्र; प्रशासनाची कसरत

 Sillog taluka increased thirst | सिल्लोड तालुक्याची तहान वाढली

सिल्लोड तालुक्याची तहान वाढली

googlenewsNext

श्यामकुमार पुरे
सिल्लोड : सिल्लोड शहरासह तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. वाढत्या तापमानामुळे दिवसेंदिवस टंचाईच्या झळाही तीव्र होत असून तालुक्यातील ५९ गावांना ८४ टँकरने पाणीपुरवठा केला जात असून २३ गावांसाठी ४६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. १७ गावांचे टँकर मागणीचे प्रस्ताव प्रलंबित असल्याने तालुक्यातील तब्बल ९९ गावांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.
सिल्लोड शहराला खेळणा येथील खोदलेल्या चारीतून दर सहा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. चारनेर-पेंडगाव व केळगाव वगळता सर्वच प्रकल्प कोरडे पडल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. चारनेर-पेंडगाव प्रकल्पाच्या संपादीत क्षेत्रातील विहिरी प्रशासनाने ताब्यात घेतल्या आहेत. २०१२ च्या दुष्काळाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. थेंब थेंब पाण्यासाठी प्रशासन तारेवरची कसरत करताना दिसत आहे. केळगाव, जांभई जलसाठ्यावर टँकरला पाणी भरण्यासाठी २४ तास वीजपुरवठा करावा, असे आदेश जिल्ह्याधिकाऱ्यांनी देऊन देखील त्याची अंमलबजावणी महावितरणकडून होताना दिसत नाही.
या गावांची तहान टँकरवर
तालुक्यातील मोहाळ, टाकळी जिवरग, पिंपळगाव पेठ, वांगी बुर्द, पळशी, लोणवाडी, पानस, कायगाव, बोजगाव, वरुड पिंप्री, सराटी, अंधारी, बोदवड, वडोदचाथा, बाळापूर, अनाड, देऊळगाव बाजार, वडाळी टाका, धावडा, जळकी घाट, पांगरी, डकला, धानोरा, केºहाळा तांडा, पिंपळदरी, पिंपळदरीवाडा, मुखपाठ, दीडगाव, कोटनांद्रा, धोत्रा, चिंचपूर, तलवाडा, गव्हाली, पिरोळा, म्हसला खुर्द, सावखेड़ा खु -बु, डोंगरगाव, बहुली, भराडी, चिंचवण, रेलगाव वाडी, नानेगाव वस्ती, पालोद वाडी, मांडगाव, मुर्डेश्वर वस्ती, शिरसाळा तांडा, बोरगाव सारवाणी, गोळेगाव बु, हळदा, वांगी खु, गव्हाली तांडा, उपळी, खातखेडा, पानवडोद खु, टाकळी खु, मांडणा वाडी, मोढा आदी ५९ गावांमध्ये ८४ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
१७ गावांचे प्रस्ताव प्रलंबित
पानवडोद खुर्द, वाडी, चिंचपूर, लोणवाडी, सासूरवाडा, निल्लोड वाड्या, भवन वाड्या, गोळेगाव खुर्द, जंजाळा, नाटवी, उंडणगाव वाड्या, आसडी, डोंगरगाव, पिंपळदरी, कोटनांद्रा, नानेगाव, वडाळा, गव्हाली या गावांचे टँकर मागणीचे प्रस्ताव प्रलंबित आहेत.
पाणी जपून वापरण्याचे आवाहन
सिल्लोड शहराला पाणीपुरठा करणारा खेळणा प्रकल्पात ३० बाय १० मीटर आकाराचे दोन नवीन चर खोदण्यात येत असून दोन दिवसांपूर्वीच हे काम हाती घेण्यात आले आहे. तर जुन्या चरातील साचलेला गाळ मशीनद्वारे काढण्यात येत आहे. नवीन चरला काही प्रमाणात पाणी लागले असून चराची लांबी रुंदी व खोली वाढताच त्यात पाणीसाठा वाढताच शहराला पाणीपुरठा केला जाईल. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा व नगर परिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी केले आहे.
सिल्लोड शहराला तीन दिवसांत पाणी पुरवू
यंदा दुष्काळाची पुनरावृत्ती झाली असून २०१२ मध्ये ९० गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता तर तब्बल १२५ टँकरने या गावांना पाणीपुरवठा केला जात होता. हीच परिस्थिती यंदा उद्भवली आहे. खेळणा धरण क्षेत्रात पाऊसच पडला नाही तरीही चरातून प्रती माणसी शासनाच्या २० लिटर पाण्याऐवजी प्रती माणसी चाळीस लिटर पाणी पुरविणार आहे. धरणातच दोन चर खोदण्याचे काम हाती घेतले असून चरातून पाणी उपलब्ध होताच सिल्लोड शहराला तीन दिवसात पाणी पुरवू, अशी माहिती आ. अब्दुल सत्तार यांनी दिली.
फोटो....सिल्लोड येथील खेळणा मध्यम प्रकल्पात चर खोदकामाची पाहणी करताना आ. अब्दुल सत्तार व न.प. अधिकारी.

Web Title:  Sillog taluka increased thirst

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.