फुटसाल, स्क्वॅश संघटनेतर्फे शिरगावकर यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 11:29 PM2017-12-29T23:29:18+5:302017-12-29T23:29:43+5:30

भारतीय आॅलिम्पिक महासंघाचे नवनिर्वाचित सहसचिव नामदेव शिरगावकर यांचा राज्य फुटसाल आणि स्क्वॅश संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला.

 Shragawakar felicitated by FC, Squash Association | फुटसाल, स्क्वॅश संघटनेतर्फे शिरगावकर यांचा सत्कार

फुटसाल, स्क्वॅश संघटनेतर्फे शिरगावकर यांचा सत्कार

googlenewsNext

औरंगाबाद : भारतीय आॅलिम्पिक महासंघाचे नवनिर्वाचित सहसचिव नामदेव शिरगावकर यांचा राज्य फुटसाल आणि स्क्वॅश संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला.
औरंगाबाद व मराठवाड्याच्या क्रीडाविकासासाठी आपण सदैव तत्पर व आपल्यासोबत राहीन. क्रीडा विद्यापीठ औरंगाबादबाहेर नेण्याचा कुणी प्रयत्न केल्यास सर्वांनी मतभेद विसरून एकत्र येऊन आंदोलन करावे यासाठी मी अग्रेसर राहीन, असे त्यांनी सत्कारास उत्तर देताना सांगितले. यावेळी महाराष्ट्र स्क्वॅश संघटनेचे अध्यक्ष प्रदीप खांड्रे, सचिव दयानंद कुमार, सुनील पूर्णपात्रे, राज्य फुटसाल संघटनेचे सचिव रणजित भारद्वाज, बालू स्वामी, भारतीय तलवारबाजी महासंघाचे कोषाध्यक्ष अशोक दुधारे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. संदीप जगताप यांनी केले. यावेळी औरंगाबाद जिल्हा आॅलिम्पिक संघटनेतर्फेदेखील शिरगावकर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी औरंगाबाद जिल्हा आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे, उपाध्यक्ष डॉ. उदय डोंगरे, डॉ. फुलचंद सलामपुरे, मकरंद जोशी, कोषाध्यक्ष विश्वास जोशी, श्याम तळेगावकर आदी उपस्थित होते.

Web Title:  Shragawakar felicitated by FC, Squash Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.