सय्यदपूर येथे जुगार अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 11:43 PM2019-04-09T23:43:41+5:302019-04-09T23:43:59+5:30

पोलिसांनी सय्यदपूर येथे मंगळवारी जुगार अड्डयावर धाड टाकून सहा जणांना अटक केली.

 Print to gambling at Syedpur | सय्यदपूर येथे जुगार अड्ड्यावर छापा

सय्यदपूर येथे जुगार अड्ड्यावर छापा

googlenewsNext

करमाड : पोलिसांनी सय्यदपूर येथे मंगळवारी जुगार अड्डयावर धाड टाकून सहा जणांना अटक केली. तसेच ६ हजार ५०० रुपयांसह जुगाराचे साहित्य जप्त केले.


पोलिसांनी सय्यदपूर शिवारातील गोवर्धन गवारे यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाखाली झन्ना-मन्ना नावाचा जुगार सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी छापा टाकून ६ हजार ६०० रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी भाऊसाहेब श्रावण शेळके, रामसिंग भावसिंग बारवाल, बाबासाहेब भानुदास द्वारकुंडे, परशुराम रावसाहेब मखरे, मुश्ताक मस्तान शेख यांच्याविरुद्ध करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title:  Print to gambling at Syedpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.