अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांची पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:36 AM2018-04-25T00:36:34+5:302018-04-25T00:36:34+5:30

चंद्रपुरातील तापमान मागील काही दिवसांपासून उच्चांक गाठून आहे. तीव्र उष्णतामान व सोबतच पाण्याची टंचाई यामुळे चंद्रपूरकर वैतागून गेले आहेत. या समस्येपासून नागरिकांना सोडविणारा येथील प्रशासकीय अधिकाºयांचा वर्गही सध्या पाणी पाणी करताना दिसत आहे.

Wandering water for the family members | अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांची पाण्यासाठी भटकंती

अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांची पाण्यासाठी भटकंती

googlenewsNext
ठळक मुद्देसात दिवसांपासून पाणी नाही : प्रशासकीय अधिकाºयांच्या उच्चभ्रू वस्तीलाच फटका

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपुरातील तापमान मागील काही दिवसांपासून उच्चांक गाठून आहे. तीव्र उष्णतामान व सोबतच पाण्याची टंचाई यामुळे चंद्रपूरकर वैतागून गेले आहेत. या समस्येपासून नागरिकांना सोडविणारा येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांचा वर्गही सध्या पाणी पाणी करताना दिसत आहे. सिव्हील लाईनमधील या अधिकाºयांच्या वस्तीत मागील सात दिवसांपासून पाणी पुरवठा झाला नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची पाळी आली आहे.
विशेष म्हणजे, स्वत:च्या कुटुंबीयांचीच पाण्यासाठीची भटकंती हे अधिकारी थांबवू शकत नाही तर चंद्रपूरकरांची पाणा टंचाईतून मुक्ती कशी करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
चंद्रपुरात सध्या भीषण पाणी टंचाई आणि तीव्र उष्णतामान या समस्यांनी उग्र रुप धारण केले आहे. सूर्य मागील काही दिवसांपासून आग ओकत आहे. सकाळी ९ वाजतापासून नागरिकांना उन्हाचे चटके बसू लागले आहे. दिवसा दुपारी रस्ते ओस पडू लागले आहे. पारा ४५ अंशापार गेल्याने चंद्रपूरकर होरपळून निघत आहे. अशातच दुसरीकडे चंद्रपूरकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या इरई धरणातील जलसाठाही झपाट्याने कमी होत आहे. शहरात एक दिवसाआड तर काही ठिकाणी दोन-तीन दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे चंद्रपूरकर पाणी टंचाईचा सामना करीत आहेत.
येथील सिव्हील लाईन हा परिसर उच्चभ्रू लोकांची वस्ती समजली जाते. या परिसरात जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची निवासस्थाने आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या या वस्तीत मागील सात दिवसांपासून पाणी पुरवठा होत नसल्याची माहिती आहे. अधिकाऱ्यांची कुटुंबीय पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. सात दिवसांपासून पाणी येत नसताना येथील अधिकाºयांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविले नाही. वरिष्ठ अधिकारी व बांधकाम विभागातील अभियंता यांच्यात समन्वय नसल्याने कुटुंबीयांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी पाण्याची समस्या होती. आता तेवढी तीव्र समस्या नाही, असे सांगितले. मात्र मागील सात दिवसांपासून नळाला पाणी येत नसल्याने या वस्तीत टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागल्याचीही माहिती आहे.
या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सी.आर. कोटगीरवार यांना विचारणा केली असता ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. उपविभागीय अभियंता यू. डब्ल्यू. भोयर यांना याबाबत विचारल्यानंतर सांगता येईल, असे म्हणाले.
समन्वयाचा अभाव
सिव्हील लाईन परिसरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे क्वार्टर्स सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतात. मात्र येथील वरिष्ठ अधिकारी व बांधकाम विभागातील अभियंत्यांमध्ये आपसी समन्वय नाही. त्यामुळे यासारख्या अडचणी निर्माण होत आहेत. दोघांनी मिळून अशा समस्यांचा निपटारा करणे अपेक्षित आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. आपल्यास समस्या अधिकारी सोडवू शकत नाहीत, तेव्हा नागरिकांच्या समस्या ते कशा सोडवतील, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
टान्स्फार्मरमध्ये बिघाड
सिव्हील लाईनमधील अधिकाऱ्यांच्या क्वार्टर्ससाठी दोन ट्रान्सफार्मर आहेत. यातील एक ट्रान्सफार्मर वीज वितरण कंपनीचा तर दुसरा सार्वजनिक बांधकाम विभागाने दाब नियंत्रित करण्यासाठी लावला आहे. यातील बांधकाम विभागाच्या ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड झाल्याची माहिती आहे. त्यामुळेच क्वार्टरमध्ये पाण्याची समस्या निर्माण झाली व वीज पुरवठाही खंडित झाल्याची माहिती आहे.

सिव्हील लाईन परिसरातील वीज वितरण कंपनीचे ट्रान्सफार्मर सुरू आहे. त्यात कुठलाही बिघाड नाही. मात्र वीज दाब नियंत्रित करण्यासाठी बांधकाम विभागाने लावलेल्या दुसºया ट्रान्सफार्मरमध्ये काही दिवसांपासून बिघाड झाल्याची माहिती आहे.
- आनंद कुमरे, जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, चंद्रपूर.

Web Title: Wandering water for the family members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.