पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 10:57 PM2018-08-05T22:57:32+5:302018-08-05T22:58:22+5:30

गेल्या १५ ते २० दिवसांपासून पाऊस बेपत्ता असल्याने शेतपिकांची वाढ पूर्णत: खुंटली आहे. एकीकडे हरीतक्रांतीचे स्वप्न पाहतअसताना निसर्ग शेतकऱ्यांना साथ देत नसल्याने शेतीवर अवकळा येत आहे. आता आॅगस्ट महिन्यातच पाऊस बेपत्ता झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाअभावी यावर्षी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होऊन त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Due to the absence of rains, the growth of crops will be depleted | पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली

पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली

Next
ठळक मुद्देपाऊस बेपत्ता : निसर्ग शेतकऱ्यांना साथ देईना

लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : गेल्या १५ ते २० दिवसांपासून पाऊस बेपत्ता असल्याने शेतपिकांची वाढ पूर्णत: खुंटली आहे. एकीकडे हरीतक्रांतीचे स्वप्न पाहतअसताना निसर्ग शेतकऱ्यांना साथ देत नसल्याने शेतीवर अवकळा येत आहे. आता आॅगस्ट महिन्यातच पाऊस बेपत्ता झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाअभावी यावर्षी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होऊन त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शेतीला पावसाची नितांत गरज असताना पावसाने ऐनवेळी हुलकावणी दिली आहे. दहा-पंधरा दिवस दमदार पाऊस पडल्यानंतर नदी, नाले, ओसडूंन वाहू लागले होते. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. यात काही भागात शेतीला मोठा फटका बसला होता. मात्र आता पावसाने दडी मारल्याने पावसाअभावी शेतीच संकटात सापडली आहे. आॅगस्ट महिन्याचा आठवडा उलटला आहे. दरवर्षी या महिन्यात चांगलाच पाऊस पडतो. परंतु, पाऊस दिवसेंदिवस शेतकºयांना हुलकावणी देत असल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे.
पाऊस नसल्याने पिकांची वाढ पूर्णत: खुंटली आहे. त्यामुळे उत्पादनावर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता असून उत्पादनात यावर्षी घट झाली तर शेतकरी पुन्हा कर्जाच्या कचाट्यात सापडेल, अशी शक्यता आहे. निसर्गाच्या पाण्यावर शेती करण्याचे दिवस आता जवळजवळ संपत आले आहे. निसर्ग शेतकºयांना साथ देत नाही. त्यामुळे कृषीक्षेत्रावर मोठ्या प्रमाणात अवकळा आली आहे.
पिक वाढणार नाही तर उत्पादन होणार कसे, अशी शेतकºयांना चिंता आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकºयाला पावसाची प्रतीक्षा लागली आहे.

कसे पूर्ण होणार हरितक्रांतीचे स्वप्न?
निसर्गाचा असा लहरीपणा कायम राहिल्यास त्याचा मोठा परिणाम शेतीवर होणार आहे. शेतकरी सुखी, समृद्धी होण्यासाठी शेतीची भरभराट होणे आवश्यक आहे. परंतु, निसर्ग शेतकºयांना साथ देत नसल्याने व सिंचनाची अपूरी सुविधा असल्याने दिवसेंदिवस शेतकरी कर्जबाजारी होत आहे.
शेतकºयांना पावसाची प्रतीक्षाच
आॅगस्ट महिना आला तरी शेतकºयांना अजूनही पाऊस बेपत्ता असल्याने पिकांच्या वाढीकरिता पाण्याची नितांत गरज आहे. परंतु, पाऊस येत नसल्याने शेतकºयांना पावसाची प्रतीक्षाच करावी लागत आहे.

धानपिकांवरही दुष्काळाचे सावट ; रोवणी खोळंबली
मारोडा : मूल परिसरात गेल्या १५ दिवसांपासून पावसाचा पत्ता नसल्याने धानपिकांवर दुष्काळाचे सावट पसरले आहे. सुरू झालेले रोवणीची कामे खोळंबल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाचा पत्ता नाही. पंधरा दिवसांपुर्वी पडलेल्या पावसाने कसे-बसे रोवणीचे काम आजपर्यंत सुरू होते. परंतु, आता पाणी आटले असून ज्यांच्याकडे मोटारपंप आहे, त्यांना विजेशी संघर्ष करुन रोवणीची कामे करावी लागत आहेत. परंतु जी शेती उंचवट्यावर व नहराच्या कालव्यांशी आहे, त्यांचे शेत कोरडे पडत आहे. चार दिवसापूर्वी मजूर मिळत नव्हते. आता शेतात पाणीच नसल्याने संकट उभे ठाकले आहे. या परिसरात धान हे मुख्य पीक असून अनेक शेतकºयांची चिंता वाढली आहे.

Web Title: Due to the absence of rains, the growth of crops will be depleted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.