सावलीत काँग्रेसचा आक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 11:18 PM2017-10-05T23:18:02+5:302017-10-05T23:18:12+5:30

केंद्र व राज्य शासनाने कर्जमाफीच्या नावावर शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसली. तर अच्छे दिनचे आमिष दाखवून संपूर्ण भारतीयांची फसवणूक केल्याचा आरोप करीत सावलीच्या तहसील कार्यालयावर

 Congress's Aakash Morcha in shade | सावलीत काँग्रेसचा आक्रोश मोर्चा

सावलीत काँग्रेसचा आक्रोश मोर्चा

Next
ठळक मुद्देशेतकºयांचा उत्स्फूर्त सहभाग : तहसील कार्यालयासमोर घोषणाबाजी

लोकमत न्यूज नेटवर्क
सावली : केंद्र व राज्य शासनाने कर्जमाफीच्या नावावर शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसली. तर अच्छे दिनचे आमिष दाखवून संपूर्ण भारतीयांची फसवणूक केल्याचा आरोप करीत सावलीच्या तहसील कार्यालयावर काँग्रेसने धडक मोर्चा काढून शासनाचा निषेध नोंदविला.
सावली-ब्रह्मपुरी क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चात तालुक्यातील संतप्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नोटबंदी, पेट्रोल, डिझेलची भाववाढ, सिलिंडरची भाववाढ, घरगुती उपयोगांच्या वस्तुंची भाववाढ, जीवनावश्यक वस्तुंची भाववाढ करून सामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजुरांचे कंबरडे मोडणाºया केंद्र व राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. अच्छे दिन येणार असे आश्वासन देऊन प्रत्येकी पंधरा लाख रुपये खात्यात जमा होणार, काळा पैसा भारतात परत आणणार, अशा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भुलथापेला बळी पडलेल्या शेतकºयांनी मोदींची प्रेतयात्रा काढून शासनाच्या निर्णयाप्रति आपला रोष व्यक्त केला. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, विनायक बांगडे, विनोद दत्तात्रय, गडचिरोलीचे माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. राम मेश्राम, नंदू नागरकर, प्रकाश पाटील मारकवार, दिनेश चिटनूरवार, नंदा अल्लुरवार, उषा भोयर, सावलीच्या नगराध्यक्ष रजनी भडके, उपाध्यक्ष विलास यासलवार, जि.प. सदस्य वैशाली शेरकी, भास्कर गड्डमवार, मनोहर गेडाम, संदीप पुण्यपवार, राकेश गड्डमवार आदी उपस्थित होते.
सावली नगरपंचायत समोरच्या प्रांगणातून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. तहसील कार्यालयासमोर मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन सावली तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजू सिद्धम यांनी केले तर आभार पं.स. सदस्य विजय कोरेवार यांनी मानले. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन सावलीच्या तहसीलदारांमार्फत शासनाला पाठविण्यात आले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.

Web Title:  Congress's Aakash Morcha in shade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.