ग्रामीण भागात जलसंकट उद्भवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 10:10 PM2019-03-16T22:10:18+5:302019-03-16T22:10:51+5:30

यंदा जिल्ह्यात अल्प पाऊस पडल्याने ग्रामीण भागातील जलस्त्रोतांची पातळी खालावली. यावर तातडीने उपाययोजना केली नाही पिण्याचे पाणी आणि कृषी सिंचनाचा प्रश्न तीव्र होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ग्रामीण भागात विहिरी व हातपंपांची संख्या वाढली.

Causing water conservation in rural areas | ग्रामीण भागात जलसंकट उद्भवणार

ग्रामीण भागात जलसंकट उद्भवणार

Next
ठळक मुद्देउपाययोजनांची गरज : बंद हातपंप दुरुस्तीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : यंदा जिल्ह्यात अल्प पाऊस पडल्याने ग्रामीण भागातील जलस्त्रोतांची पातळी खालावली. यावर तातडीने उपाययोजना केली नाही पिण्याचे पाणी आणि कृषी सिंचनाचा प्रश्न तीव्र होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
ग्रामीण भागात विहिरी व हातपंपांची संख्या वाढली. विविध योजनांच्या माध्यमातून शेकडो शेतकऱ्यांनी सिंचन विहिरी खोदल्या. परंतु, यंदा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी झाले. परिणामी, नैसर्गिक जलस्त्रोतांची पातळी खालावली आहे. पाण्याअभावी काही विहिरी व हातपंप कोरड्या झाल्या आहेत. पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी योग्य प्रयत्न झाले नाही. काही कंपन्यांनी पिण्याचे पाणी उद्योगासाठी वळविले, असाही आरोप केला जात आहे. उपसा जास्त असल्याने जमिनीच्या आतल्या पाण्याची पातळी दिवसागणिक खाली जात आहे. तालुकास्तरावरही हेच चित्र दिसून येते. अनेक वॉर्डांमध्ये खासगी हातपंप खोदून वारेमाप उपसा केला जात आहे. यासाठी भूजल विभागाची परवानगी घेतली नाही. जिल्ह्यातील जलसंकट लक्षात घेऊन उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली.
नदी, नाले आटताहेत
उद्योग कंपन्यांचे पाणी नदीत जात असल्याने प्रदूषित झाल्या आहेत. नदी हा पाण्याचा मुख्य स्रोत असतो. माणसाला जगायला व विकास करायलाही पाणी लागते. परंतु, नियोजन नसल्याने पुढील महिन्यात पिण्याचे पाणी मिळणे कठीण होणार आहे. कंपन्यांनी नदीच्या साह्याने प्रगती केली पण पाण्याची शुद्धता राखली नाही. रासायनिक पाणी सोडून नद्यांची बहुजैविकता नष्ट केली. या नद्यांना नाले जोडून आहेत. याचा अनिष्ट परिणाम नाल्यांवर झाला. राज्य सरकारने जलधोरण तयार केले. यातील तरतुदींची अंमलबजावणी कागदावरच राहिल्याचा आरोप जिल्ह्यातील सरपंचांनी केला आहे.
पिके संकटात
शेतात मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर होत असल्याने जमिनीचा पोत बिघडला. यावर अद्याप उपाययोजना झाली नाही. पाण्याअभावी वर्षातून एकदा धानाची शेती केली जाते. नाल्याद्वारे पाण्याचा वापर होतो. भात शेतीनंतर भाजीपाला पिके घेता येत नाही. आता तर सर्वच पिके संकटात आहेत.
आजाराचा धोका
जिल्ह्यातील काही गावांमध्ये अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याने विविध आजारांचा धोका निर्माण झाला आहे. जिवती, कोरपना तालुक्यातील आदिवासी व कोलाम पाड्यांमध्ये पुरेसे पाणी मिळत नाही. मार्च महिन्यापासून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गावात पाणीच मिळत नसल्याने कुठूनही ही गरज भागविण्यासाठी गावकरी हतबल झाले. यातून विविध आजारांची लागण होऊ शकते.

Web Title: Causing water conservation in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.