मलकापूर तालुक्यात ३३ गावांवर पाणीटंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 12:49 AM2018-02-27T00:49:19+5:302018-02-27T00:49:19+5:30

मलकापूर: येणार्‍या काळात मलकापूर तालुक्यातील ३३ गावात पाणी  टंचाईचे सावट आहे. त्यासाठी ऑक्टोबर १७ ते जून १८ या दरम्यान  पं.स. प्रशासनाने तीन टप्प्यात त्यावर मात करण्यासाठीचे नियोजन करीत  उपाययोजना आखल्याची माहिती असून, बर्‍याच गावांची भिस्त नळगंगा  धरणाच्या जलसाठय़ावर निर्भर असल्याच सूत्रांनी सांगितले आहे. 

Water crisis at 33 villages in Malkapur taluka | मलकापूर तालुक्यात ३३ गावांवर पाणीटंचाईचे सावट

मलकापूर तालुक्यात ३३ गावांवर पाणीटंचाईचे सावट

googlenewsNext
ठळक मुद्देतीन टप्प्यात नियोजननळगंगा धरणावर भिस्त

हनुमान जगताप। 
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर: येणार्‍या काळात मलकापूर तालुक्यातील ३३ गावात पाणी  टंचाईचे सावट आहे. त्यासाठी ऑक्टोबर १७ ते जून १८ या दरम्यान  पं.स. प्रशासनाने तीन टप्प्यात त्यावर मात करण्यासाठीचे नियोजन करीत  उपाययोजना आखल्याची माहिती असून, बर्‍याच गावांची भिस्त नळगंगा  धरणाच्या जलसाठय़ावर निर्भर असल्याच सूत्रांनी सांगितले आहे. 
मलकापूर तालुक्यातील ६६ पैकी ३३ गावात म्हणजे ५0 टक्के पाणी  टंचाईचे संकट येण्याची शक्यता आहे. 
त्यात ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान हरणखेड विहीर अधिग्रहित  करण्यात आली असून, वझीरबादचा प्रस्ताव प्राप्त झाल्याने लवकरच  त्यावर मंजुरी होईल, असे सूत्रांनी पहिल्या टप्प्यात रणगाव, शिवणी,  भालेगाव, निंबोळा, वाघोळा, चिंचोल, भानगुरा, वडजी, वरखेड,  कुंडखुर्द, तांदुळवाडी, झोडगा, वाघुड अशा ११ गावात विंधन विहिरीचे  प्रस्ताव आहेत. यापैकी दोन गावात खासगी विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव  कृती आराखड्यात आहेत.
तिसर्‍या टप्प्यात एप्रिल ते जून १८ दरम्यानच्या कालावधीत वाकोडी,  मलकापूर ग्रामीण, खामखेड, पिंपळखुटा महादेव,  गौलखेड, निंबाळी,  कुंड खुर्द, हरसोडा, अशा ८ गावात विंधन विहिरींचे प्रस्ताव आहेत. 
यापैकी वाकोडी मलकापूर ग्रामीण आदी मोठय़ा गावात ४ टँकरचे प्रस् ताव आहेत. त्यांची भिस्त नळगंगा धरणाच्या जलसाठय़ावर असून, तो  कमी झाल्यास टँकर वाढू शकतात. याशिवाय पिंपळखुटा, लासुरा,  वरखेड, पिंपळखुटा बु., कुंड बु., तांदुळवाडी, वाघुड, येथेही खासगी  विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव आहेत, तर पिंपळखुटा बु., निमखेड अशा  २ गावांसाठी टँकर प्रस्तावित आहेत.
 सद्यस्थितीत उपाय योजनाविषयी नमूद करावयाचे झाल्यास हरणखेड  गौलखेड येथे योजना सुरू आहेत, तर वझीराबाद, बहापुरा, पिंपळखुटा  महादेव या ठिकाणचे प्रस्ताव मंजुरीच्या मार्गावर आहेत. एकंदरीत तालु क्यातील ६६ पैकी ३३ गावावर पाणी टंचाईचे सावट असून, त्यावर मात  करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसल्याचे दिसत.

तालुक्यात मोठय़ा संख्येत गावे ही नळगंगा धरण व हतनूर धरणाच्या  बॅकवॉटर यावर अवलंबून आहेत. ‘त्या’ गावासह टंचाईग्रस्त गावासाठी  काय? उपाययोजना करायच्या त्याविषयी आम्ही प्रयत्नशील आहोत.  आमच्या प्रयत्नांना नक्की यश येईल, असा आम्हाला विश्‍वास आहे.
-डॉ.एस.टी. चव्हाण, गटविकास अधिकारी, मलकापूर
 

Web Title: Water crisis at 33 villages in Malkapur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.