आदिवासी ग्राम वसाली येथे भीषण पाणीटंचाई; घोटभर पाण्यासाठी महिलांची भटकंती 

By विवेक चांदुरकर | Published: May 13, 2024 05:37 PM2024-05-13T17:37:01+5:302024-05-13T17:38:13+5:30

वसाली येथील पाणीटंचाइकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने येथील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

severe water shortage in tribal village vasali wandering of women for a sip of water in buldhana | आदिवासी ग्राम वसाली येथे भीषण पाणीटंचाई; घोटभर पाण्यासाठी महिलांची भटकंती 

आदिवासी ग्राम वसाली येथे भीषण पाणीटंचाई; घोटभर पाण्यासाठी महिलांची भटकंती 

विवेक चांदूरकर, संग्रामपूर : एका बाजूला वाढत्या तापमानामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले असतांना संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी गावातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना रखरखत्या उन्हात भटकंती करावी लागत आहे. दुसरीकडे जनावराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाल्याने पशूपालक त्रस्त झाले आहेत.

वसाली येथील पाणीटंचाइकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने येथील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. सातपुडा पर्वत रांगेतील आदिवासी ग्राम वसाली येथे गेल्या काही दिवसांपासून कुपनलिकेतील मोटर पंपात बिघाड झाला. नादुरुस्त झालेल्या पंपांची तातडीने दुरुस्ती करण्यात आली नसल्याने येथे पाण्याची समस्या उद्भवली. परीणामी येथील आदिवासी बांधवांची घोटभर पाण्यासाठी रखरखत्या उन्हात वणवण भटकंती सुरू आहे. पाण्यासाठी महिलांचे प्रचंड हाल होत असून येथील पाणी प्रश्न गंभीर होत आहे. मात्र, याकडे ग्रामपंचायत गांभिर्याने पाहत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाणीटंचाईच्या भीषण झळा सोसाव्या लागत आहेत. अगोदरच उकाड्याने हैराण केले असून उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वर सरकत आहे. सूर्य आग ओकत असल्याने अंगाची लाही लाही होत आहे. ग्रामपंचायतीच्या नियोजन शुन्य कारभारामुळे गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असल्याचा आरोप होत असून ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

दहा पैकी केवळ एकच हातपंप सूरू-

वसाली येथे १० हात पंप बसविण्यात आले आहेत. यापैकी ९ हातपंप बंद असून केवळ एकच हातपंप सूरू असल्याने येथील ग्रामस्थांना भिषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी खालावल्याने एकच हातपंप सूरू असल्याची माहिती ग्रामसेवकाने दिली आहे.

कुपनलिकेतील नादुरुस्त मोटर पंप बाहेर काढून दुरूस्ती करण्यात आले. दुरुस्त पंपाला पुन्हा कुपनलिकेत सोडण्यात आले असून गावातील पाणी पुरवठा नेहमी प्रमाणे सुरळीत करण्यात आला आहे.- बी. पी. धोंडगे, ग्रामसेवक, वसाली ता. संग्रामपूर

Web Title: severe water shortage in tribal village vasali wandering of women for a sip of water in buldhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.