नरूभाऊ... मला चिखलीवर हवाय भगवा - उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली अपेक्षा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 01:05 AM2018-02-14T01:05:42+5:302018-02-14T01:06:15+5:30

चिखली : गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेच्या ढाण्या वाघाची घरवापसी होणार असल्याच्या चर्चेने चांगलाच जोर धरला होता. अखेर काँग्रेसमध्ये घुसमट होत असल्याने प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी १२ फेब्रुवारी रोजी शिवसेना भवन मुंबई येथे शिवसेनेत प्रवेश घेतल्याने या चर्चेवर शिक्कामोर्बत झाले असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रा. खेडेकरांना शिवबंध बांधून पक्षात प्रवेश देण्यासह चिखलीत भगवा फडकविण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Nirubha ... I want to say Chackhalie Saffron - Uddhav Thackeray expressed it | नरूभाऊ... मला चिखलीवर हवाय भगवा - उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली अपेक्षा 

नरूभाऊ... मला चिखलीवर हवाय भगवा - उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली अपेक्षा 

googlenewsNext
ठळक मुद्देनरेंद्र खेडेकरांचा शिवसेनेत प्रवेश

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेच्या ढाण्या वाघाची घरवापसी होणार असल्याच्या चर्चेने चांगलाच जोर धरला होता. अखेर काँग्रेसमध्ये घुसमट होत असल्याने प्रा.नरेंद्र खेडेकर यांनी १२ फेब्रुवारी रोजी शिवसेना भवन मुंबई येथे शिवसेनेत प्रवेश घेतल्याने या चर्चेवर शिक्कामोर्बत झाले असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रा.खेडेकरांना शिवबंध बांधून पक्षात प्रवेश देण्यासह चिखलीत भगवा फडकविण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
शिवसेना भवन मुंबई येथे १२ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या या पक्ष प्रवेश सोहळय़ाला शिवसेना नेते मनोहर जोशी, खा.संजय राऊत, खा.आनंदराव अडसूळ, जिल्हा संपर्क प्रमुख खा.प्रतापराव जाधव, खा.भावना गवळी, आमदार डॉ.शशिकांत खेडेकर, आमदार डॉ.संजय रायमुलकर, जिल्हाप्रमुख जालींधर बुधवत, माजी आमदार विजयराज शिंदे, भास्करराव मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना २८८ जागा स्वबळावर लढून जिंकणार असल्याचा विश्‍वास व्यक्त करून त्यानुषंगाने चिखली विधानसभेवर भगवा फडकविण्यासाठी जोमाने प्रयत्न करा, असे सांगितले, तसेच यापुढे भाजपासोबत कदापि युती करणार नसल्याचे स्पष्ट करीत भाजपासोबत युती का तोडली, हे सांगण्याची आता गरज नाही. केवळ हिंदुत्वाच्या मुद्यावर युती केली होती; मात्र सत्तेचे राजकारण करीत त्यांनी शिवसेनेला झुलवत ठेवले. आता त्यांना भगव्याची ताकद दाखवून द्यावी लागेल, यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे, शिवसैनिक एकवटल्यास कुणाशी युती करण्याची गरज नसल्याचेही त्यांनी सांगितले, तर विदेशात जावून हिंदुंची मंदिरे बांधणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या देशातील अयोध्येतील राम मंदिर मात्र अद्यापही बांधणे झाले नसल्याची टीका करून पाकिस्तान आपल्या भूमीवर येऊन आपल्याशी युद्ध करीत आहे. हे दहशतवादी हल्ले नसून, आपल्याच भूमिचा वापर आपल्या सैनिकांना टिपण्यासाठी केला जात आहे आणि आपल्या देशाचे सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, प्रा.नरेंद्र खेडेकर यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनीदेखील शिवसेनेत प्रवेश घेतला. यावेळी मनोज नगरिया, उपजिल्हाप्रमुख सिद्धुसिंग राजपूत, युवासेना जिल्हाप्रमुख ऋषी जाधव, उपजिल्हाप्रमुख रोहित खेडेकर, शहरप्रमुख नीलेश अंजनकर, विश्‍वास खंडागळे, विलास सुरडकर, नरेश राजपूत, शिवाजी पवार, प्रदीप वाघ, किसन धोंडगे, विलास घोलप, विलास राजपूत, सखाराम भुतेकर, रवि भगत, o्रीराम झोरे, राजेश झगरे, कृष्णा वाघ, दिलीप चिंचोले, रामकृष्ण अंभोरे, समाधान जाधव, शुभम खेडेकर, विनायक पडघान, रवि पेटकर, रमेश म्हस्के, अनिल कर्‍हाडे यांच्यासह शिवसेनेचे अनेक आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. 

पक्षप्रवेशानंतर शहरात जल्लोषात स्वागत
शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून आपली वेगळी छाप उमटविल्यानंतर काँग्रेसवासी झालेले प्रा.नरेंद्र खेडेकर यांची शिवसेनेत घरवापसी झाल्याने शिवसैनिकांमध्येही उत्साह संचारला आहे. प्रा.खेडेकरांच्या पक्षप्रवेशानंतर १३ फेब्रुवारी रोजी शहरात आगमन होताच शिवसैनिकांसह त्यांच्या सर्मथकांनी त्यांचे फटाक्यांच्या आतषबाजीने जल्लोषात स्वागत केले.

Web Title: Nirubha ... I want to say Chackhalie Saffron - Uddhav Thackeray expressed it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.