शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी ; सेंट्रल बँकेचा शाखाधिकारी आणि शिपाई निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 04:45 PM2018-06-24T16:45:12+5:302018-06-24T17:07:03+5:30

Demand of sex to farmer's wife; central bank officer Suspended | शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी ; सेंट्रल बँकेचा शाखाधिकारी आणि शिपाई निलंबित

शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी ; सेंट्रल बँकेचा शाखाधिकारी आणि शिपाई निलंबित

Next
ठळक मुद्देसेंट्रल बँकेचे अकोला येथील क्षेत्रीय प्रबंधक नरेंद्र मलालीकर यांनी २३ जून रोजी सायंकाळी ही कारवाई केली. अटक करण्यात आलेला बँकेचा शिपाई मनोज चव्हाण (रा. अकोला) याचे ह्रदयाचे ठोके वाढल्याने त्याला मलकापूर येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिस कारवाई झाल्यानंतर सेंट्रल बँकेच्या क्षेत्रीय कार्यालयाकडून विभागीय चौकशी होईल, असे सुत्रांनी सांगितले.

बुलडाणा : पीककर्जासाठी शेतकऱ्याच्या अर्धांगिणीला शरीर सुखाची मागणी करणाऱ्या दाताळा येथील सेंट्रल बँकेचा शाखाधिकारी राजेश हिवसे आणि त्याला सहाय्य करणाऱ्या शिपाई मनोज चव्हाण यांना निलंबीत करण्यात आले आहे. सेंट्रल बँकेचे अकोला येथील क्षेत्रीय प्रबंधक नरेंद्र मलालीकर यांनी २३ जून रोजी सायंकाळी ही कारवाई केली. या प्रकरणात लवकरच उपरोक्त दोघांची विभागीय चौकशी होणार आहे. दरम्यान, या प्रकरणात अटक करण्यात आलेला बँकेचा शिपाई मनोज चव्हाण (रा. अकोला) याचे ह्रदयाचे ठोके वाढल्याने त्याला मलकापूर येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सेंट्रल बँकेच्या एका अधिकार्याने मलकापूर येथे जाऊन त्याच्या हातात निलंबनाची नोटीस बजावली असून त्यावर त्याची स्वाक्षरीही घेतली आहे. दुसरीकडे सेंट्रल बँकेचे आणखी एक अधिकारी हे वर्धा येथे पोहोचले असून दाताळा शाखाधिकाऱ्याच्या तेथील घरावर राजेश हिवसेला निलंबीत करण्यात आले असल्याबाबतची नोटीस त्याच्या वर्ध्यातील स्टेट बँक कॉलनीतील घरावर चिपकविण्यात आली आहे. राजेश हिवसे सध्या फरार असून पोलिसांचे पथक त्याचा शोध घेत आहेत. दाताळा येथील सेंट्रल बँकेच्या शाखेत पीककर्जाच्या मागणीसाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीस तेथील शाखाधिकारी राजेश हिवसे याने शरीर सुखाची मागणी केली होती. यासंदर्भात पीडित महिलेने मोबाईलवरील त्याचे संभाषण रेकॉर्ड करून मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्या आधारावर पोलिसांनी सेंट्रल बँकेचा शाखाधिकारी राजेश हिवसेसह त्याला मदत करणारा शिपाई मनोज चव्हाण यांच्या विरोधात अपराध क्र. १०८/१८ कलम ३५४ अ, (२), भादंवि, सहकलम ३ (१), (डब्ल्यू), (१),३ (१), (डब्ल्यू) (२) अनुसुचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये २२ जून रोजी गुन्हा दाखल केला होता. तेव्हा पासून शाखा व्यवस्थापक हिवसे आणि शिपाई हे दोघेही फरार झाले होते. दरम्यान, या दोघांना पडकण्यासाठी मलकापूर ग्रामीण पोलिसांनी दोन पथके नियुक्त केली होती. त्यातील एका पथकाने शिपाई मनोज चव्हाण यास अटक केली आहे. त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला मलकापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहीती सुत्रांनी दिली. 

हिवसेच्या घरावर निलंबनाची नोटीस

या प्रकरणातील प्रमुख आरोपी तथा दाताळा सेंट्रल बँकेचा शाखाधिकारी राजेश हिवसे सध्या फरार असून त्याचे तडकाफडकी २३ जून रोजी सायंकाळी निलंबन करण्यात आले आहे. तो फरार असल्याने एकीकडे पोलिस त्याचा शोध घेत असतानाच सेंट्रल बँकेचे एक पथक थेट वर्धा येथील त्याच्या घरी पोहोचले असून त्याच्या घरावर निलंबनाची नोटीस चिपकविण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याचे या पथकातील अधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

लवकरच विभागीय चौकशी

या प्रकरणातील मुख्य आरोपी राजेश हिवसे आणि शिपाई मनोज चव्हाण यांच्यावर सध्या विभागीय चौकशीची टांगती तलवार आहे. या प्रकरणी पोलिस कारवाई झाल्यानंतर सेंट्रल बँकेच्या क्षेत्रीय कार्यालयाकडून विभागीय चौकशी होईल, असे सुत्रांनी सांगितले. त्यात प्रसंगी ते दोषी आढळल्यास प्रकरणाचे गांभिर्य पाहता ते बडतर्फही होऊ शकतात.

Web Title: Demand of sex to farmer's wife; central bank officer Suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.