संतापजनक! पिक कर्ज मंजूर करून देण्यासाठी बँक व्यवस्थापकाने शेतकऱ्याच्या पत्नीकडे केली शरीरसुखाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 02:25 PM2018-06-22T14:25:38+5:302018-06-23T15:04:48+5:30

पिक कर्ज मंजूर करून देण्यासाठी शेतकऱ्याच्या पत्नीकडे सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या शाखाधिकाऱ्याने शरीरसुखाची मागणी केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

Demand of sex to farmer's wife to sanction the crop loan | संतापजनक! पिक कर्ज मंजूर करून देण्यासाठी बँक व्यवस्थापकाने शेतकऱ्याच्या पत्नीकडे केली शरीरसुखाची मागणी

संतापजनक! पिक कर्ज मंजूर करून देण्यासाठी बँक व्यवस्थापकाने शेतकऱ्याच्या पत्नीकडे केली शरीरसुखाची मागणी

googlenewsNext
ठळक मुद्देदाताळा गावातील शेतकरी त्याच्या पत्नीसोबत पिक कर्जासाठी गुरूवारी सकाळी दाताळा येथील सेंट्रल बँकेत गेला.कागदपत्रांची चाळणी करून तुमचा मोबाईल नंबर द्या, अशी सूचना बँक व्यवस्थापकाने केली.संबंधित शेतकऱ्याने त्याच्या पत्नीचा मोबाईल नंबर दिला. त्यावर शाखाधिकाऱ्याने अश्लिल संभाषण करून  शरीरसुखाची मागणी केली.

मलकापूर : पीक कर्जासाठी शरीरसुखाची मागणी करणाऱ्या तालुक्यातील दाताळा येथील सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या शाखाधिकाऱ्यांविरुध्द संबधित महिलेच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांत विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

तालुक्यातील दाताळा गावातील शेतकरी त्याच्या पत्नीसोबत पिक कर्जासाठी गुरूवारी सकाळी दाताळा येथील सेंट्रल बँकेत गेला. कागदपत्रांची चाळणी करून तुमचा मोबाईल नंबर द्या, अशी सूचना बँक व्यवस्थापकाने केली. त्या अनुषंगाने संबंधित शेतकऱ्याने त्याच्या पत्नीचा मोबाईल नंबर दिला. त्यावर शाखाधिकाऱ्याने अश्लील संभाषण करून  शरीरसुखाची मागणी केली. मोबदल्यात पिककर्जासोबत वेगळा पॅकेज देईल, असा निरोप शिपायामार्फत महिलेला पाठविला.

संबंधित महिलेने बँक व्यवस्थापकाशी झालेल्या संवादाचे रेकॉर्डींग करून मलकापूर ग्रामीण पोलिसात तक्रार नोंदविली.  त्याअनुषंगाने पोलिस निरिक्षक बी.आर. गावंडे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात तपासचक्रे फिरविली. चौकशी अंती गुरूवारी रात्री महिलेच्या तक्रारीवरून सेंट्रल बँकेचे शाखाधिकारी राजेश हिवसे व शिपाई मनोज चव्हाण या दोघांविरोधात अपराध नं. १०८ /१८ कलम ३५४ अ, (२),  भादंवि, सहकलम ३ (१), (डब्ल्यू) (१),३ (१),(डब्ल्यू) (२) अनुसुचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस उपविभागीय अधिकारी गिरीश बोबडे यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोरी फरार आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, फरार आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Demand of sex to farmer's wife to sanction the crop loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.