पूर्णा पुलावरील अपघातप्रकरणी कंटेनरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 02:02 AM2017-12-09T02:02:20+5:302017-12-09T02:02:53+5:30

नांदुरा : तालुक्यातील येरळी जवळील पूर्णा नदीच्या पुलावर ७ डिसेंबरच्या दुपारी झालेल्या बस व कंटेनरच्या अपघातप्रकरणी बसचालक हरिभाऊ लोणकर यांच्या तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी मृत कंटेनरचालकाविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे.

In the accident on Purna bridge, the accused filed a case against the Container | पूर्णा पुलावरील अपघातप्रकरणी कंटेनरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

पूर्णा पुलावरील अपघातप्रकरणी कंटेनरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देमानव विकास मिशनच्या बसचा व्यावसायिक वापर

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदुरा : तालुक्यातील येरळी जवळील पूर्णा नदीच्या पुलावर ७ डिसेंबरच्या दुपारी झालेल्या बस व कंटेनरच्या अपघातप्रकरणी बसचालक हरिभाऊ लोणकर यांच्या तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी मृत कंटेनरचालकाविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे.
अपघातातील बसचालक हरिभाऊ लोणकर यांनी नांदुरा पो.स्टे.ला  दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, आरोपी कंटेनर  क्रमांक एमएच ४0 वाय ८५0९ च्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून जळगाव-बुलडाणा बसला धडक देऊन बसचे सुमारे वीस हजार रुपयांचे नुकसान केले व त्याच्या ताब्यातील ट्रेलर पुलावरुन पलटी करून स्वत:च्या मरणास कारणीभूत ठरला. बसचालकाच्या तक्रारीवरून नांदुरा मृत कंटेनरचालकाविरुद्ध कलम २७९, ३0४ अ व ४२७ भादंविनुसार गुन्ह्याची नोंद केली आहे. 

 मानव विकास मिशनच्या बसचा व्यावसायिक वापर
अपघातग्रस्त बस ही मानव विकास मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना येणे-जाणे करण्यासाठी आगाराला मिळाली आहे. त्याच प्रथम उद्देश विद्यार्थिनींची वाहतूक असताना त्या बसचा व्यावसायिक वापर जळगाव आगाराने केला आहे. विद्यार्थिनी बसफेर्‍यांसाठी ताटकळत आगारात असतात त्यांना या बससेवेचा लाभ न देता तिचा व्यावसायिक वापर जळगाव आगारात केला, याची चर्चा आहे.

Web Title: In the accident on Purna bridge, the accused filed a case against the Container

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.