५३ दिवसात कोट्यवधी रुपयांच्या कर वसुलीचे ‘टार्गेट’;  पालिका सरसावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 05:44 PM2019-02-05T17:44:42+5:302019-02-05T17:44:48+5:30

बुलडाणा: आर्थिक वर्ष संपुष्टात येण्यासाठी अवघे ५३ दिवस उरले असताना कोट्यवधी रुपयांच्या कर वसुलीचे ‘टार्गेट’ पालिकांसमोर आहे.

53 lakh tax collections 'target' in 53 days | ५३ दिवसात कोट्यवधी रुपयांच्या कर वसुलीचे ‘टार्गेट’;  पालिका सरसावल्या

५३ दिवसात कोट्यवधी रुपयांच्या कर वसुलीचे ‘टार्गेट’;  पालिका सरसावल्या

Next

- ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा: आर्थिक वर्ष संपुष्टात येण्यासाठी अवघे ५३ दिवस उरले असताना कोट्यवधी रुपयांच्या कर वसुलीचे ‘टार्गेट’ पालिकांसमोर आहे. जिल्ह्यातील पालिकांची मालमत्ता व पाणीपट्टी वसुलीसाठी कसरत सुरू झाली असून उद्दिष्टाच्या ९० टक्के हून अधिक कर वसुलीचे लक्ष पालिकांसमोर आहे. या कर वसुलीच्या आधारावरच पालिकांना पायाभूत सुविधांसाठी अनुदान उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकांनी कर वसुलीची बाब गांभीर्याने घेऊन वसुलीची मोहीम सुरू केली आहे. 
आर्थिक वर्षाच्या अखेरीस सर्व व्यवहार पूर्ण करणे व इतर कामकाजही मार्गी लावण्यासाठी शासकीय कार्यालयात युद्धस्तरावर प्रयत्न सुरू होतात. २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा शेवट तोंडावर आला असल्याने प्रशासकीय पातळीवरून विविध कामांना वेग आला आहे. मार्च अखरेपर्यंत कर वसुलीचे टार्गेट पालिकांना देण्याता आलेले आहे. शहरातील बहुतांश मालमत्ता धारक आणि काही शासकीय कार्यालयांकडे गेल्या काही वर्षांपासून कर थकीत आहे. अशा मालमत्ता धारकांचे नळ कनेक्शन आणि इतर सुविधा बंद करण्यासोबतच दंडात्मक कारवाईही पालिका प्रशासनाकडून केल्या जाते. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील पालिका प्रशासनाने कर वसुलीकडे आपले लक्ष वळविले आहे. मार्चअखेरची मुदत जवळ येत असल्याने मालमत्ता व पाणीपट्टी वसुलीसाठी पालिकांकडून विशेष पथक नमेण्यात आलेले आहे. या पथकामध्ये १० ते १५ अधिकारी व कर्मचाºयांचा सहभाग असून शहरात प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुली केली जात आहे. या पथकाची सध्या दारोदारी वारी सुरू आहे. बुलडाणा नगर पालिकेला पाणीपट्टी व मालमत्ता कर वसुलीचे ४ कोटी ४७ लाख ५१ हजार ८०४ रुपये उद्दिष्ट आहे. आतापर्यंत १ कोटी ६२ लाख ७५ हजार ३५७ रुपयांची करवसुली करण्यात आली आहे. बुलडाणा पालिकेचे ३६.३६ टक्के करवसुली आजपर्यंत झाली आहे. जिल्ह्यातील इतर पालिकांमध्येही कर वसुलीच्या मोहीमेला आता वेग आला आहे. 

 
बुलडाण्याची पाणीपट्टी वसुली ३२ टक्क्यावर
बुलडाणा नगर पालिकेची आतापर्यंत पाणीपट्टी व मालमत्ता कर वसुली ३६.३६ टक्के झाली आहे. त्यामध्ये पाणीपट्टीचे २ कोटी ४२ लाख १५ हजार ४२१ रुपये उद्दिष्टापैकी ७६ लाख ७२ हजार ६२८ रुपये म्हणजे ३२ टक्के वसुली पूर्ण झाली आहे. तर मालमत्ता कर २ कोटी ५ लाख ३६ हजार ८३ रुपये उद्दिष्टापैकी ४१.८९ टक्के म्हणजे ८६ लाख २ हजार ७२९ रुपये वसुली करण्यात आली आहे. 

 
नळबंदीसाठी ४८ तासाची डेडलाईन
पाणीपट्टी न भरणाºयांची नळ जोडणी बंद करण्यासाठी ४८ तासाची डेडलाईन पालिका प्रशासनाकडुन देण्यात येत आहे. नोटीस आल्यानंतर पाणी कर भरला नाही, तर जेसीबीच्या सहाय्याने नळ कनेक्शन तोडण्यात येते. बुलडाणा पालिकेकडून ही कारवाई सुरू करण्यात आली असून जिल्ह्यातील इतर पालिकांमध्येही कारवाईच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. 

 
पाणीपट्टी व मालमत्ता कर वसुलीसाठी पालिका प्रशासनाकडून कार्यवाही सुरू आहे. मार्चअखेरपर्यंत ९० टक्क्यापेक्षा अधिक वसुली पूर्ण होईल. यासाठी प्रत्येक थकीत करदात्यांनी काळजीने आपला कर भरल्यास नळ बंद करण्याची वेळ येणार नाही. 
- गजानन चिंचोले, कर निरिक्षक, बुलडाणा. 
 

Web Title: 53 lakh tax collections 'target' in 53 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.