Marathawada Muktisangram Din : जलक्षेत्रातील नवीन पिढी कोठे आहे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 02:01 PM2018-09-17T14:01:00+5:302018-09-17T14:02:20+5:30

पाण्याबाबत मराठवाडा आज एका वळणावर उभा आहे. शंकरराव चव्हाणांनी जलविकासाची दमदार सुरुवात करून दिली. त्या काळात जलक्षेत्रातील नेतृत्व मराठवाड्याकडे होते. त्यांच्या नंतर तेवढ्या ताकदीने पाण्याचे राजकारण करणारा राजकीय नेता मराठवाड्यात झाला नाही.

Marathwada Muktisangram Din: Where is the new generation for water field ? | Marathawada Muktisangram Din : जलक्षेत्रातील नवीन पिढी कोठे आहे ?

Marathawada Muktisangram Din : जलक्षेत्रातील नवीन पिढी कोठे आहे ?

googlenewsNext

- प्रा. प्रदीप पुरंदरे,जलतज्ज्ञ

मराठवाड्याच्या विकासासाठी धोरणात्मक व्यूव्हरचना करणारा आणि त्यानुसार कृती करणारा दुसरा बाप माणूस म्हणजे गोविंदभाई श्रॉफ. शंकरराव आणि गोविंदभार्इंनंतर मराठवाडा खरेच पोरका झाला. जलक्षेत्रात एकेकाळी महाराष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या मराठवाड्याची फरपट सुरू झाली. ती अजून चालूच आहे. छोटे-मोठे राज्यस्तरीय सिंचन प्रकल्प, लघु पाटबंधारे (स्थानिक स्तर), उच्च पातळी बंधारे इत्यादी स्वरूपाचा जलविकास म्हटले, तर मोठ्या प्रमाणावर झाला आहे. बांधकामाधीन प्रकल्प लवकर पूर्ण झाले तर त्यात निश्चितच आणखी भर पडेल. अन्य नदी-खोऱ्यातून पाणी आणण्याच्या महत्त्वाकांक्षी योजना खरेच साकारल्या गेल्या तर सोने पे सुहागा! जलसाठे वाढवणे हे एका मर्यादेपर्यंत आवश्यक असतेच; पण त्याचा अतिरेक झाला, तर नदी-खोऱ्यातील वरच्या भागातील प्रकल्प त्याच नदी-खोऱ्यातील खालच्या भागातील प्रकल्पांना घातकही ठरू शकतात.  जायकवाडी, पूर्णा, ऊर्ध्व पैनगंगा इतर प्रकल्पांत आज हे होत आहे. 

पाणी वाटपाच्या प्रश्नाकडे केवळ प्रादेशिकवादाच्या भूमिकेतून पाहणे योग्य नाही. नदी-खोरेनिहाय जलविकास व व्यवस्थापन हेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्याकरिता एकात्मिक राज्य जलआराखडा, पाटबंधारे विकास मंडळांऐवजी नदी-खोरे अभिकरणे आणि नदी-खोरेनिहाय व्यवस्थापनाचे नियम तयार करणे या बाबी जास्त गांभीर्याने घेण्याची गरज आहे. शक्यता अशी आहे की, पश्चिम महाराष्ट्र हे सर्व करील. त्याचा फायदा त्यांना मिळाल्यावर मग मराठवाड्याला जाग येईल. जलविकास म्हणजे केवळ धरणे बांधणे नव्हे. जल-व्यवस्थापन, जल-कारभार आणि जल-नियमन या बाबींकडे अभूतपूर्व दुर्लक्ष झाल्यामुळे निर्माण झालेली सिंचन-क्षमता पुरेशी वापरली जात नाही. पाणी वाटपात विषमता आणि वापरात अकार्यक्षमता आहे. सिंचन प्रकल्पांचे लाभ सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले नसल्यामुळे ते संघर्षाबाबत उदासीन आहेत.
 

Web Title: Marathwada Muktisangram Din: Where is the new generation for water field ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.