नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी पाठपुरावा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 12:05 AM2019-06-03T00:05:40+5:302019-06-03T00:08:15+5:30

दुष्काळामुळे अडचणीत असलेल्या शेतकºयांना दिलासा देतांना कृषि, महसूल, ग्रामविकास, महावितरण आदी शासकीय विभागांनी संवेदनशिलपणे काम करावे असे निर्देश पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

Follow-up for subsidy of farmers paying regular loans | नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी पाठपुरावा करणार

नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी पाठपुरावा करणार

Next
ठळक मुद्देपंकजा मुंडे : खरीप, दुष्काळ, टंचाई आढावा बैठकीत विविध प्रश्नांवर चर्चा

बीड : दुष्काळामुळे अडचणीत असलेल्या शेतकºयांना दिलासा देतांना कृषि, महसूल, ग्रामविकास, महावितरण आदी शासकीय विभागांनी संवेदनशिलपणे काम करावे असे निर्देश पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. नियमित कर्जभरणा करणाºया शेतक-यांच्या अनुदानाचा विषय मंत्रीमंडळाच्या बैठकीत मांडणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
रविवारी येथे जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत पालकमंत्री बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हार, आ. सुरेश धस, आ. भिमराव धोंडे, आ. आर.टी. देशमुख, आ. लक्ष्मण पवार, आ. संगिता ठोंबरे, जि. प. उपाध्यक्षा जयश्री मस्के, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते कृषि विभागाने तयार केलेल्या भितीपत्रक, घडीपुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले. यामध्ये कपाशी वरील बोंडअळी नियंत्रण नियंत्रण, व्हाईट बग (खुमणीचे) नियंत्रण, तसेच शेतकºयांसाठी माहितीचे मोबाईल अ‍ॅपलॉन्च करण्यात आले.
पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, नियोजन केलेल्या जास्तीत जास्त शेतक-यांना सौरपंप मिळावे म्हणून महावितरणने तात्काळ काम करावे. दुष्काळाच्या पाशभूमीवर शेतक-यांची वीज खंडीत केली जाऊ नये, असेही त्या म्हणाल्या.
खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी शेतकºयांच्या बॅँकेविषयीच्या अडचणी सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. शासनाच्या सर्व विभागांनी योग्य काम करुन शेतक-यांना दिलासा द्यावा, असे आ. सुरेश धस म्हणाले. आ. संगीता ठोंबरे यांनी सोयाबीन उत्पादक शेतक-यांना पीकविमा भरपाई मिळावी याकडे लक्ष वेधले. आ. देशमुख,आ. पवार, आ. धोंडे यांनीही यावेळी चर्चेत भाग घेतला.
जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी पीक कर्ज व शेती अनुदान शेतक-यांना मिळावे यादृष्टीने जिल्हयातील बँकामार्फत कार्यवाही केली जाईल असे सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सोयाबीन क्षेत्रात साडेतीनशे टक्यांनी वाढ झाली असून कापूस क्षेत्र दीडशे टक्यांनी वाढत आहे.
खरीप हंगामासाठी जिल्हयात ६०,००५ मे.टन खत पुरवठा होणार असून, कापूस बियाणे ७ लाख २२ हजार २५ पाकिटे प्रत्यक्ष पुरवठयासाठी उपलब्ध केले असल्याचे सांगण्यात आले.
अनुदान मिळण्यात अडचण नाही
दुष्काळामुळे शेतक-यांना शासनाने कर्जमाफी दिलेली आहे. त्यामधील नियमित कर्ज भरणा-या खातेदार शेतक-यांना अनुदान मिळण्यात अडचण नाही.
थकबाकी आणि दुष्काळामुळे अडचणीतील शेतकºयांना अनुदान मिळत नसल्याने बीड, उस्मानाबाद, परभणी आदी दुष्काळी भागातील शेतकºयांना अनुदान रक्कमा मिळण्यासाठी योग्य ते निर्देश संबंधितांना दिले जावे यासाठी मंत्रीमंडळ बैठकीमध्ये प्रयत्न करु असे पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या.
आष्टी, पाटोदा, शिरुरसाठी अहमदनगर येथील पाणी
पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी पाणी टंचाई वरील उपाययोजनांचा आढावा घेतला.
त्या म्हणाल्या, आष्टी, पाटोदा, शिरुर तालुक्यातील जनतेच्या पाण्यासाठी नगर जिल्हा प्रशासनाला सूचना देण्यात येतील.
त्यासाठी विभागीय आयुक्त व जलसंपदा विभागातील संबंधितांशी बोलून प्रश्न सोडवू.
गेवराईसाठी विशेष उपाययोजनेस मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता दिल्याचेही पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.
आमदारांनी मांडले प्रश्न
गेवराई येथील पाणीटंचाई वरील उपाय योजनांबाबत आमदार पवार यांनी प्रश्न मांडले.
आष्टी पाटोदासाठी सीना प्रकल्पातून पाणी प्राप्त होत आहे. पण येथील पाणी अपुरे असल्याने कुकडीतून पाणी मिळावे अशी सूचना आ. धोंडे व आ. धस यांनी मांडली.
इतर आमदारांनीही त्यांच्या मतदार संघातील परिस्थिती मांडली.
जिल्हयातील पाणी प्रकल्पात १५८ दलघमी साठा शिल्लक असून उपयुक्त पाणी टक्केवारी ०.५६२ टक्के असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

Web Title: Follow-up for subsidy of farmers paying regular loans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.