कार-दुचाकी अपघातात एकाचा जागीच मृत्यू; केज तालुक्यातील घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 08:14 PM2018-07-13T20:14:11+5:302018-07-13T20:15:20+5:30

अंबाजोगाई-आडस रस्त्यावर इंडिका कार व दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार विष्णू सदाशिव कोटे (वय-५८) यांचा जागीच मृत्यू झाला.

Death of a man in a car-bike accident; Events in kaij Taluka | कार-दुचाकी अपघातात एकाचा जागीच मृत्यू; केज तालुक्यातील घटना 

कार-दुचाकी अपघातात एकाचा जागीच मृत्यू; केज तालुक्यातील घटना 

googlenewsNext

केज (बीड ) : अंबाजोगाई-आडस रस्त्यावर इंडिका कार व दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार विष्णू सदाशिव कोटे (वय-५८) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज (दि. १३)दुपारी ३.१५ वाजेच्या सुमारास केंद्रेवाडी शिवारात झाला. 

आडस येथील व्यापारी विष्णू कोटे हे आपल्या दुचाकीवरून  (एमएच४४-एल२३८२) आडसकडे येत होते. ते केंद्रेवाडी शिवारात आले असताना समोरून भरधाव वेगात एक कार ( क्रमांक एमएच २४-एल ००१७) येत होती.कार चालक संतोष सिरसठ याचे वळणावर गाडीवरील ताबा सुटला व त्याने दुचाकीस जोराची धडक दिली. कारचा वेग अधिक असल्याने, दुचाकी कारसोबत तीस फुट अंतरापर्यंत फरफटत गेली. यात दुचाकीस्वार विष्णू कोटे यांचा जागीच मृत्यू झाला. 

कारचालक संतोष सिरसाठ व विशाल खरात हे दोघे (रा. धारूर) जखमी झाले. जखमींवर अंबाजोगाई येथील शासकीय दवाखान्यात उपचार करण्यात येत आहेत. 

Web Title: Death of a man in a car-bike accident; Events in kaij Taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.