बस-ट्रकची धडक; २० प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 11:28 PM2019-02-17T23:28:05+5:302019-02-17T23:28:57+5:30

शहराबाहेर असलेल्या राष्ट्रीय महामार्ग ६१ वरील परभणी रोडवर रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बस - ट्रकची धडक झाली. यामध्ये २० प्रवासी किरकोळ जखमी झाले. त्यांना तात्काळ ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले.

Bus-truck hit; 20 passengers injured | बस-ट्रकची धडक; २० प्रवासी जखमी

बस-ट्रकची धडक; २० प्रवासी जखमी

Next

माजलगाव : शहराबाहेर असलेल्या राष्ट्रीय महामार्ग ६१ वरील परभणी रोडवर रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बस - ट्रकची धडक झाली. यामध्ये २० प्रवासी किरकोळ जखमी झाले. त्यांना तात्काळ ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले.
लातूर-मानवत ही बस (एमएच २०-बीएल ३०९७) माजलगाव येथील बसस्थानकातून निघून मानवतकडे जात असताना राष्ट्रीय महामार्गावरील घळाटवाडी फाट्यावर समोरून ट्रक आडवा आल्याने बस चालकाने तात्काळ बस थांबविली. तरीही अपघात होऊन बसचा समोरील भाग ट्रकवर आदळला. त्यामुळे बेसावध असलेल्या प्रवाशांना जोरदार धक्का बसला. यामध्ये २० प्रवाशांना किरकोळ जखम झाली.
घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका पाठवून जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉ.गजानन रूद्रवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ उपचार केले. तहसीलदार एन. जी. झंपलवाड, रामदासी यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली.
जखमींमध्ये यांचा समावेश
आरती शिवाजी भोसले (तेलगाव), किसन केरबा गिराम, शिवकन्या किसन गिराम (पेठ बाभळगाव ता.पाथरी), नर्मदा गहिरे (रामपुरी ता.पाथरी), सुमन नारायण जाधव, नारायण गिराम (आंबेगाव ता.मानवत), धरम बापूराव कचरे, अन्वर इकबाल, ज्ञानोबा अनरथ गायकवाड (परभणी), अकबर मोमीन (पात्रूड), रेहाना बेगम, पार्वती भागवत रेडेवार (मानवत) यांचा जखमींमध्ये समावेश आहे. उपचार करून जखमींना घरी पाठविण्यात आले.

Web Title: Bus-truck hit; 20 passengers injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.