बलात्काराचा गुन्हा नोंदविणारी महिला, भावावर आरोपीचा तलवारीने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 12:01 PM2019-02-18T12:01:50+5:302019-02-18T12:06:24+5:30

एक आरोपी औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलात पोलीस कर्मचारी होता.

The woman and her brother who registered the crime of rape, attacked with a sword by accused | बलात्काराचा गुन्हा नोंदविणारी महिला, भावावर आरोपीचा तलवारीने हल्ला

बलात्काराचा गुन्हा नोंदविणारी महिला, भावावर आरोपीचा तलवारीने हल्ला

googlenewsNext
ठळक मुद्देगंभीर जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचारआरोपींमध्ये बडतर्फ पोलीस कर्मचारी

औरंगाबाद : बलात्काराची फिर्याद नोंदविणाऱ्या महिलेसह तिच्या मानलेल्या भावावर आरोपी व त्याच्या साथीदारांनी तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना शनिवारी रात्री १०.४५ वाजेच्या सुमारास सातारा परिसरातील सुधाकरनगर रस्त्यावर घडली. जखमी रवींद्र तोगे यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले. 

सचिन पालेजा, राहुल पालेजा, संदीप शिंदे, पवन तांबे आणि अन्य दोन अनोळखींचा आरोपींमध्ये समावेश आहे. सचिन पालेजा हा बडतर्फ पोलीस कर्मचारी आहे. सातारा पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार महिला ही सातारा परिसरातील रहिवासी असून, ती सिडकोत खानावळ चालविते. सचिन पालेजासोबत तिची जुनी ओळख आहे. १४ रोजी प्लॉट दाखविण्याच्या निमित्ताने  कारमधून नेऊन सचिनने वडजी शिवारातील  निर्जनस्थळी बलात्कार केल्याची तक्रार पीडितेने बदनापूर पोलीस ठाण्यात नोंदविली आहे.  बलात्काराचा गुन्हा नोंदवून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पीडिता १६ फेब्रुवारी रोजी रात्री मानलेला भाऊ रवींद्र तोगेसोबत दुचाकीने सुधाकरनगर रस्त्याने जात होती. त्यावेळी त्यांना कारमधून आलेल्या ( एमएच-२०-५५५३) सचिन पालेजा, राहुल पालेजा, संदीप शिंदे, पवन तांबे आणि अन्य दोन अनोळखींनी तलवारीने रवींद्र तोगेंवर हल्ला केला. आरोपींनी पीडितेला मारहाण करून तिचा विनयभंग केला. आरोपी कारमध्ये बसून तेथून  पळून गेले. या हल्ल्यात रवींद्र गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडला.  सातारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी रवींद्र आणि पीडितेला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले. 

सचिन पालेजा आधी पोलीस नंतर वाळू व्यावसायिक
सचिन पालेजा हा पूर्वी औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलात पोलीस क र्मचारी होता. त्याला खात्यातून काढून टाकल्यापासून तो वाळू व्यवसायात उतरला आहे. तर पालेजाचा साथीदार संदीप शिंदेवर झाल्टा फाट्याजवळ काही दिवसांपूर्वी प्राणघातक हल्ला झाला होता.

Web Title: The woman and her brother who registered the crime of rape, attacked with a sword by accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.