आयकर विभागाची 'मेगा छापेमारी'; औरंगाबादेतील ४ उद्योगसमूहासंबंधी देशभरात ८० ठिकाणी तपास सुरु 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 02:14 PM2018-08-23T14:14:48+5:302018-08-23T14:24:12+5:30

शहरातील चार उद्योग समूहाच्या बेहीशिबी मालमत्ता व कर चुकवेगिरी प्रकरणी आयकर विभागाचे मंगळवारपासून धाडसत्र सुरु आहे.

'Mega raid' of Income Tax Department; Four companies in Aurangabad have investigation started in 80 locations across the country | आयकर विभागाची 'मेगा छापेमारी'; औरंगाबादेतील ४ उद्योगसमूहासंबंधी देशभरात ८० ठिकाणी तपास सुरु 

आयकर विभागाची 'मेगा छापेमारी'; औरंगाबादेतील ४ उद्योगसमूहासंबंधी देशभरात ८० ठिकाणी तपास सुरु 

googlenewsNext

औरंगाबाद : शहरातील चार उद्योग समूहाच्या बेहीशिबी मालमत्ता व कर चुकवेगिरी प्रकरणी आयकर विभागाचे मंगळवारपासून धाडसत्र सुरु आहे. शहरातील त्यांच्या कार्यालयात तपासणी सोबतच आयकर विभागाने या उद्योग समूहांच्या संबंधित देशभरातील ८० ठिकाणी धाडसत्र केले असून तपासणी सुरु आहे.  

येथील २ बिल्डर्स, एक ऑइल मिल व एक मोठा उद्योग समूह यांच्यावर मंगळवारी (दि.२१ ) सकाळी एकाच वेळी आयकर विभागाने धाड टाकली. ही कारवाई बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी करण्यात आली. तसेच या चारही उद्योग समूहांच्या संबंधित देशभरात ८० ठिकाणीसुद्धा धाड टाकण्यात आल्याची माहिती आहे. यात मुंबई, पुणे, सुरत, हैद्राबाद, जयपूर आदी ठिकाणांचा समावेश आहे.  

आयकर विभागाच्या या 'मेगा छापेमारीत' २५० कर्मचारी व अधिकाऱ्यांचा सहभाग आहे. सर्वजण मंगळवारपासून या उद्योग समूहांच्या कागदपत्रांची आणि संबंधित मालमत्तांची कसून तपासणी करत आहेत. देशभरातील ही तपासणी आणखी दोन दिवस सुरू राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
 

Web Title: 'Mega raid' of Income Tax Department; Four companies in Aurangabad have investigation started in 80 locations across the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.