बागापूर परिसरात बिबट्याचा वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 11:26 PM2019-05-06T23:26:41+5:302019-05-06T23:26:58+5:30

तालुक्यातील बागापूर परिसरात बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थांची भंबेरी उडाली आहे. अलीकडच्या तीन - चार दिवसांत अनेक शेतकऱ्यांना बिबट दिसल्याने त्यांनी मार्ग बदविला आहे. वनविभागाच्या ट्रॅप कॅमेºयामध्ये बिबट कैद झाला आहे. या शिवारात बिबट दिसल्याच्या घटनेला वनविभागाने दुजोरा दिला असून परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leopard in the Baghapur area | बागापूर परिसरात बिबट्याचा वावर

बागापूर परिसरात बिबट्याचा वावर

googlenewsNext
ठळक मुद्देवनविभागाच्या कॅमेरात कैद : शेळी केली फस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर रेल्वे : तालुक्यातील बागापूर परिसरात बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थांची भंबेरी उडाली आहे. अलीकडच्या तीन - चार दिवसांत अनेक शेतकऱ्यांना बिबट दिसल्याने त्यांनी मार्ग बदविला आहे. वनविभागाच्या ट्रॅप कॅमेºयामध्ये बिबट कैद झाला आहे. या शिवारात बिबट दिसल्याच्या घटनेला वनविभागाने दुजोरा दिला असून परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या बिबटाने तीन दिवसांपूर्वी बागापूर येथील शेतकरी मनोहर पांडुरंग कोकर्डे यांची शेळी फस्त केली. यानंतर वनविभागातर्फे या परिसरात ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले. या कॅमेरात एक बिबट कैद झाल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांनी दिली. हा बिबट्या पुढे जळका (जगताप), सालोरापर्यंत गेल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. काही दिवसांपूर्वी जळका (जगताप) मध्ये बिबट असल्याची चर्चा सुरू होती. परंतु बागापूर परिसरात दिसलेला बिबट तोच आहे की अन्य, याबाबत माहिती मिळू शकली नाही. दरम्यान शेतामध्ये जाणाºया शेतकरी - शेतमजुरांनी सतर्क राहावे, शेतामध्ये कुणीही विद्युत प्रवाह सोडू नये, असे आवाहन वनविभागातर्फे करण्यात आले आहे.
वीजप्रवाह सोडू नये, ग्रामस्थांना पत्र
शेतामध्ये कोणीही विद्युतप्रवाह सोडू नये, याबाबत संबंधित ग्रामपंचायतला वनविभागातर्फे पत्र देण्यात आले आहे. तसेच शेळीचे नुकसान झालेल्या व्यक्तीला लवकरच वनविभागातर्फे मदत मिळेल. नागरिकांनी सतर्क राहावे. बिबट्याबद्दल अधिक माहिती मिळाल्यास वनविभागाला कळवावे, असे आवाहन चांदूर रेल्वे वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांनी केले. चांदूर रेल्वे व वडाळी वनपरिक्षेत्रात बिबट्यांची संख्या वाढली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खाद्यासह पाण्याची कमतरता भासत असल्याने बिबटांसह तृणभक्षी वन्यप्राणी बागायती शेती वा शहरालगतच्या परिसरात कूच करीत आहेत. अशा स्थितीत नागरिकांनी सावध राहण्याची गरज असल्याचे वनविभागाने कळविले आहे.

Web Title: Leopard in the Baghapur area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.