शेतकऱ्यांना तंत्रज्ञानापासून वंचित ठेवण्याचे धोरण चुकीचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 04:31 PM2018-04-28T16:31:23+5:302018-04-28T16:31:23+5:30

शेतकऱ्यांना तंत्रज्ञानापासून वंचीत ठेवण्याचे सरकारचे उफराटे धोरण चुकीचे आहे, अशा शब्दात शेतकरी संघटनेने केंद्रीय गृह व रसायन मंत्री हंसराज यांच्या कडे शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त केल्या.

 Wrong policy of farmers to deny technology! | शेतकऱ्यांना तंत्रज्ञानापासून वंचित ठेवण्याचे धोरण चुकीचे!

शेतकऱ्यांना तंत्रज्ञानापासून वंचित ठेवण्याचे धोरण चुकीचे!

Next
ठळक मुद्देशेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अकोला येथे आलेल्या ना.हंसराज अहीर यांना एक निवेदन सादर करून शेतकऱ्यांच्या भावना कळवल्या. बीटी ट्रायल्स वर बंदी आणताना कुठलेही ठोस निष्कर्ष सरकार ला आजतागायत देता आल्या नाहीत.


अकोला : श्रम, बुद्धी, गुंतवणुकीच्या बळावर धोका पत्करून संपत्तीचे सृजन करणारा शेतकरी स्वत:च आपले उत्पन्न वाढवतो व देशाच्या संपत्तीतही भर घालत असतो फक्त सरकारने त्याच्या तंत्रज्ञान व बाजारपेठाच्या मागार्तील अडसर दूर करावे. शेतकऱ्यांना तंत्रज्ञानापासून वंचीत ठेवण्याचे सरकारचे उफराटे धोरण चुकीचे आहे, अशा शब्दात शेतकरी संघटनेने केंद्रीय गृह व रसायन मंत्री हंसराज यांच्याकडे  शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त केल्या.
शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अकोला येथे आलेल्या केंद्रीय गृह व रसायन राज्यमंत्री ना.हंसराज अहीर यांना एक निवेदन सादर करून त्यांच्या मार्फत केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या भावना कळवल्या. शेती हा देशाचा मुख्य प्राथमीक व्यवसाय असून देशातील ६०% जनसंख्या कृषीवर अवलंबून असतांना जागतीक परिवेशामध्ये भारतीय शेतकरी अद्यावत तंत्रज्ञानाशिवाय स्पर्धेमध्ये कसा टीकेल हा मोठा प्रश्न सरकारच्या तंत्रज्ञान विरोधी धोरणांमुळे उदभवला आहे. नुकत्याच झालेल्या हंगामात गुलाबी बोन्ड अळी च्या प्रादुभार्वा ने ४५% एवढे उत्पादनाचे नुकसान झाले. कीटकनाशकांवर मोठा खर्च होऊन आर्थीक नुकसाना मुळे शेतकऱ्यांमध्ये आलेल्या उद्विग्नतेला जबाबदार कोण? या वर आत्मचिंतन होणे गरजेचे आहे.सरकारच्या तंत्रज्ञान विरोधी धोरणांमुळे भारतीय शेतकरी स्पर्धाक्षम होण्यास अडसर निर्माण झाला आहे. बीटी ट्रायल्स वर बंदी आणताना कुठलेही ठोस निष्कर्ष सरकार ला आजतागायत देता आल्या नाहीत. जगातील अनेक प्रगत देशांत बीटी चे अद्यावत तंत्रज्ञान वापरत असल्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च कमालीचा घटला उत्पादकताही प्रचंड वाढली आहे. अशा परिस्थितीत जनसंख्येचा मोठा हिस्सा शेतीवर अवलंबून असलेल्या आपल्या देशात शेतकºयांना तंत्रज्ञानापासून वंचीत ठेवण्या चे उफराटे धोरण चुकीचे आहे, अशा भावना शेतकरी संघटनेने केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांच्या मार्फत सरकारला कळविल्या. यावेळी सोशल मेडिया प्रमुख विलास ताथोड, युवा आघाडी विदर्भ प्रमुख डॉ.निलेश पाटील,शेतकरी संघटना प.विदर्भ प्रमुख धनंजय मिश्रा,जिल्हा प्रमुख अविनाश नाकट उपस्थित होते.

 

Web Title:  Wrong policy of farmers to deny technology!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.