व्यापाऱ्यांच्या खराब उडिदाची खरेदी:  मार्केटिंग अधिकारी तराळे यांची चौकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 01:16 PM2018-11-23T13:16:26+5:302018-11-23T13:16:35+5:30

अकोला: शेतकºयांचा ‘नॉन एफएक्यू’ उडीद न घेता तोच उडीद व्यापाºयांनी केंद्रात आणल्यानंतर खरेदी केल्याने याप्रकरणी निलंबित झालेले महाराष्ट्र राज्य को-आॅप. मार्केटिंग फेडरेशनचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी राजेश तराळे यांची विभागीय चौकशी सुरू झाली आहे.

Purchase of bad ladders: Marketing officer inquiry started | व्यापाऱ्यांच्या खराब उडिदाची खरेदी:  मार्केटिंग अधिकारी तराळे यांची चौकशी सुरू

व्यापाऱ्यांच्या खराब उडिदाची खरेदी:  मार्केटिंग अधिकारी तराळे यांची चौकशी सुरू

Next

- सदानंद सिरसाट
अकोला: शेतकºयांचा ‘नॉन एफएक्यू’ उडीद न घेता तोच उडीद व्यापाºयांनी केंद्रात आणल्यानंतर खरेदी केल्याने याप्रकरणी निलंबित झालेले महाराष्ट्र राज्य को-आॅप. मार्केटिंग फेडरेशनचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी राजेश तराळे यांची विभागीय चौकशी सुरू झाली आहे. त्यासाठी सेवानिवृत्त अधिकारी गोसावी यांनी गुरुवारी मार्केटिंग अधिकारी कार्यालयात सुनावणी घेतली.
हमीभावाने मूग, उडिदाची खरेदी शासनाने ३ आॅक्टोबर २०१७ पासून सुरू केली होती. खरेदी प्रक्रियेसाठी तालुका खरेदी-विक्री संस्था आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते. अकोट केंद्रात आॅनलाइन नोंदणी केलेल्या शेतकºयांचा मूग, उडीद ‘नॉन एफएक्यू’ असल्याचे कारण देत नाकारण्यात आला. तोच उडीद शेतकºयांनी खासगी व्यापाºयांना विकला. त्यावेळी व्यापाºयांनी त्यांच्याकडून सात-बाराच्या प्रतीही घेतल्या. त्या आधारे व्यापाºयांनी खरेदी केंद्रात आधीच नाकारलेला तोच उडीद केंद्रात विक्री केला. अकोट तालुका खरेदी-विक्री संस्थेने डिसेंबर २०१७ च्या पहिल्या आठवड्यात त्याचा साठा करण्यासाठी अकोला येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात पाठविला. त्या ठिकाणी ग्रेडर्सनी ४२८ क्विंटल उडीद ‘एफएक्यू’ दर्जाचा नसल्याचे जिल्हा मार्केटिंग अधिकाºयांना कळविले. त्यानुसार उडीद अकोट केंद्रात परत पाठविण्यात आला. सोबतच जिल्हा मार्केटिंग अधिकाºयांनी अकोट खरेदी-विक्री केंद्रातील संबंधित ग्रेडर्सना कारणे दाखवा नोटीसही बजावली. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करीत व्यापाºयांकडून ‘नॉन एफएक्यू’ उडीद खरेदी केल्याचे वास्तव मांडले होते. त्यामुळे हा खराब उडीद राज्य वखार महामंडळाच्या गोदामातील साठ्यातून बाहेर ठेवण्यात आला. अकोट केंद्रात खरेदी झालेल्या १९०० क्विंटल साठ्यापैकी ४२८ क्विंटल ‘नॉन एफएक्यू’ उडीद खराब असल्याने तो साठ्यातून वगळण्यात आला. त्याची जबाबदारी जिल्हा मार्केटिंग अधिकारी राजेश तराळे यांच्यावर निश्चित करण्यात आली. त्यानुसार ३ आॅक्टोबर २०१८ रोजी त्यांना महाराष्ट्र राज्य को-आॅप. मार्केटिंग फेडरेशनने निलंबित केले. त्यांची विभागीय चौकशी सुरू केली. त्यानुसार त्यांच्यावर दोषारोप ठेवले जाणार आहेत. फेडरेशनने नियुक्त केलेले सेवानिवृत्त अधिकारी गोसावी यांनी गुरुवारी तराळे यांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे बजावून सुनावणी घेतली.

अकोट खविसंही नामानिराळी
खराब उडीद खरेदी प्रकरणात केवळ मार्केटिंग अधिकारी तराळे यांच्यावर कारवाई झाली. याप्रकरणी अकोट तालुका खरेदी-विक्री संस्थेची जबाबदारी निश्चित करून कारवाई करणे आवश्यक असल्याने ती का झाली नाही, हा मुद्दा आता पुढे येत आहे.

पुंडकर यांच्या पाठपुराव्याने कारवाई
खराब उडीद प्रकरणी कारवाई होण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गजानन पुंडकर यांनी मार्केटिंग फेडरेशन, सहकार मंत्र्यांकडे सातत्याने तक्रारी केल्या. त्यानुसार फेडरेशनने याप्रकरणी चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनचे सरव्यवस्थापक के.जी. कानडे यांना तातडीने अकोल्यात पाठविले होते. अहवालानंतर तराळे यांना निलंबित करण्यात आले होते.

 

Web Title: Purchase of bad ladders: Marketing officer inquiry started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.