नियोजन कोलमडले; कासव गतीने कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 02:04 AM2017-11-02T02:04:28+5:302017-11-02T02:04:56+5:30

अकोला : गोरक्षण रोडवरील ‘बॉटल नेक’ दूर करण्यासाठी महापालिकेने मोठय़ा धडाक्यात रस्त्यालगतच्या मालमत्तांना हटविण्याची कारवाई सुरू केली. मागील दोन दिवसांपासून क्षेत्रीय अधिकारी, नगररचना विभाग व अतिक्रमण विभागाचे नियोजन कोलमडल्यामुळे गोरक्षण रोडवर कासव गतीने कारवाई होत असल्याचे चित्र बुधवारी पाहावयास मिळाले.

Employment collapses; Action on the tired speed | नियोजन कोलमडले; कासव गतीने कारवाई

नियोजन कोलमडले; कासव गतीने कारवाई

Next
ठळक मुद्देगोरक्षण रोड मालमत्ताधारकांसमोर मनपाचे अधिकारी हतबल

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : गोरक्षण रोडवरील ‘बॉटल नेक’ दूर करण्यासाठी महापालिकेने मोठय़ा धडाक्यात रस्त्यालगतच्या मालमत्तांना हटविण्याची कारवाई सुरू केली. मागील दोन दिवसांपासून क्षेत्रीय अधिकारी, नगररचना विभाग व अतिक्रमण विभागाचे नियोजन कोलमडल्यामुळे गोरक्षण रोडवर कासव गतीने कारवाई होत असल्याचे चित्र बुधवारी पाहावयास मिळाले. काही मालमत्ताधारकांसमोर मनपाचे अधिकारी हतबल ठरल्याचे दिसून आले. 
नेहरू पार्क  चौक ते संत तुकाराम चौकापर्यंत गोरक्षण रोडचे रुंदीकरण केले जात आहे. महापारेषण कार्यालय ते इन्कम टॅक्स चौक ते लक्ष्मी हार्डवेअरपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने असलेल्या मालमत्तांमुळे रस्ता रुंदीकरणाला अडथळा निर्माण झाला. रस्त्यालगतच्या मालमत्ता हटविण्यासाठी महापालिका प्रशासनाने २७ ऑक्टोबरपासून कारवाईला प्रारंभ केला असला, तरी मागील दोन दिवसांपासून प्रशासनाची कारवाई थंडावल्याचे चित्र समोर आले आहे. काही मालमत्ताधारकांनी इमारतीचे कमी नुकसान व्हावे म्हणून इमारतीचा भाग स्वत:हून पाडण्यास सुरुवात केली. त्यातील काही मालमत्ताधारक जाणीवपूर्वक कारवाईला विलंब व्हावा, या उद्देशातून एक ते दोन मजुरांच्या साहाय्याने इमारत पाडण्याचा देखावा करीत असल्याचे दिसून येत आहे. अशा मालमत्तांच्या संदर्भात जेसीबीच्या मदतीने बांधकाम जमीनदोस्त करणे अपेक्षित आहे. तसे होत नसल्यामुळे बुधवारी दिवसभर मनपाच्या सर्व जेसीबी रस्त्यालगत उभ्या असल्याचे दिसून आले. 

हॉटेल वैभवची इमारत शिकस्त?
इन्कम टॅक्स चौकातील हॉटेल वैभवची इमारत जीर्ण झाल्याची माहिती आहे. त्यामुळे ही इमारत कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. यामुळे इमारतीमधील रहिवाशांनी तातडीने ही इमारत सोडून इतरत्र स्थानापन्न होणे गरजेचे झाले आहे. इमारतीच्या कॉलमला हादरा बसल्यास ती भुईसपाट होण्याची चिन्हे असल्यामुळे मालमत्ताधारकांनी स्वत:हून मजुरांच्या साहाय्याने इमारतीचा काही भाग तोडण्याला सुरुवात केली. मात्र बुधवारी दिवसभर इमारत तोडणे किंवा इमारतीवरील मोबाइल टॉवर हटविण्याची कोणतीही कारवाई होत नसल्याचे चित्र दिसून आले.

बांधकाम पाडण्यासाठी काहींचा पुढाकार तर..
मनपाच्या जेसीबीमुळे इमारतींचे जास्त नुकसान होत असल्यामुळे काही मालमत्ताधारकांनी स्वत: पुढाकार घेत इमारतीचा अतिरिक्त भाग तोडण्यासाठी पुढाकार घेतला. गोविंद सोढा नामक बांधकाम व्यावसायिकाने अवघ्या दोन-तीन मजुरांच्या माध्यमातून मागील पाच दिवसांपासून बांधकाम तोडण्याचे काम सुरू केले. या ठिकाणी संबंधित मजूर निव्वळ वेळकाढूपणा करीत असल्याचे चित्र आहे. हा प्रकार मनपाच्या निदर्शनास येत नसल्याने सखेद आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 

जेसीबींचा वापर का नाही?
इन्कम टॅक्स चौकात काही मालमत्ताधारकांनी प्रामाणिकपणे इमारतींचा भाग तोडण्याला सुरुवात केली तर काही मालमत्ताधारकांकडून वेळ निभावण्याची भूमिका पार पाडली जात आहे. बुधवारी इन्कम टॅक्स चौकात मनपाच्या चार ते पाच जेसीबी ठाण मांडून उभ्या असल्यामुळे ज्या इमारतींसाठी जेसीबींचा वापर शक्य आहे, त्या ठिकाणी का होत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. 

 

Web Title: Employment collapses; Action on the tired speed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.