अस्तिवात नसलेल्या योजनेच्या लाभासाठी आठ हजार अर्ज 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 01:00 PM2018-08-08T13:00:50+5:302018-08-08T13:04:47+5:30

अकोला : महिलांना आजन्म प्रती महिना चार हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्याची कोणतीही योजना अस्तिवात नसताना, या योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील महिलांकडून आठ हजार अर्ज गत १ आॅगस्टपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त झाले

Eight thousand applications for the benefit of non-existent scheme | अस्तिवात नसलेल्या योजनेच्या लाभासाठी आठ हजार अर्ज 

अस्तिवात नसलेल्या योजनेच्या लाभासाठी आठ हजार अर्ज 

Next
ठळक मुद्देजिल्ह्यातील महिलांकडून १ आॅगस्टपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील आवक-जावक शाखेत आठ हजार अर्ज प्राप्त झाले.यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री अवर सचिव कार्यालयाला माहिती देण्यात आली.

अकोला : महिलांना आजन्म प्रती महिना चार हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्याची कोणतीही योजना अस्तिवात नसताना, या योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील महिलांकडून आठ हजार अर्ज गत १ आॅगस्टपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त झाले. प्राप्त झालेल्या अर्जांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री अवर सचिव कार्यालयाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले आहे.
राज्यातील १८ ते ५९ वर्षे वयोगटातील महिलांना आजन्म प्रती महिना चार हजार रुपये आर्थिक सहाय्य मिळावे, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणारे अर्ज सादर करण्याकरिता गत महिनाभराच्या कालावधीत महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी केली. प्रती महिना चार हजार रुपये अर्थिक सहाय्य देण्यात यावे, अशा मागणीचे मोठ्या प्रमाणात प्राप्त होणारे अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयातील आवक-जावक शाखेत स्वीकारण्यात आले; परंतु महिलांना आजन्म प्रती महिना चार हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्याची कोणतीही योजना शासनामार्फत राबविण्यात येत नसताना, तसेच यासंदर्भात शासनाकडून कोणतेही आदेश किंवा निर्देश नसल्याने जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या आदेशानुसार प्रती महिना चार हजार रुपये आर्थिक सहाय्य मागणीचे अर्ज स्वीकारणे गत १ आॅगस्टपासून बंद करण्यात आले. जिल्ह्यातील महिलांकडून १ आॅगस्टपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील आवक-जावक शाखेत आठ हजार अर्ज प्राप्त झाले असून, यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री अवर सचिव कार्यालयाला माहिती देण्यात आली. तसेच प्राप्त झालेल्या अर्जासंदर्भात मार्गदर्शनही मागविण्यात आले आहे.

महिलांना आजन्म प्रती महिना चार हजार रुपये आर्थिक सहाय्य मिळावे, अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणारे आठ हजार अर्ज महिलांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाले. यासंदर्भात मुख्यमंत्री अवर सचिव कार्यालयाकडे माहिती देण्यात आली असून, मार्गदर्शन मागविण्यात आले आहे.
-श्रीकांत देशपांडे
निवासी उप जिल्हाधिकारी

 

Web Title: Eight thousand applications for the benefit of non-existent scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.