घरकाम करणा-या महिलेची दोन लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 04:38 PM2018-06-02T16:38:24+5:302018-06-02T16:38:24+5:30

शबरी आदिवासी विकास महामंडळाकडून कर्ज प्रकरण करून वाहन घेऊन देण्याचे अमिष दाखवून महिलेची दोन लाख रूपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात शुक्रवारी एक फसवणूक करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल झाला.

Two lakh cheating of a woman in a home-business | घरकाम करणा-या महिलेची दोन लाखांची फसवणूक

घरकाम करणा-या महिलेची दोन लाखांची फसवणूक

Next

अहमदनगर: शबरी आदिवासी विकास महामंडळाकडून कर्ज प्रकरण करून वाहन घेऊन देण्याचे अमिष दाखवून महिलेची दोन लाख रूपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात शुक्रवारी एक फसवणूक करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल झाला.
सोलापूर जिल्ह्यातील कुमठानाका येथील सुधा सुधीर गायकवाड या महिलेस नगर तालुक्यातील वडगाव तांदळी येथील विजय देवराम भोसले याने मी शबरी आदिवासी विकास महामंडळातंर्गत लाभ मिळवून देतो़.तुम्हालाही या योजनेमार्फत वाहन घेऊन देतो असे अमिष त्याने दाखविले़ भोसले याच्यावर विश्वास ठेवून सुधा गायकवाड त्यांनी त्याला जुलै २०१४ मध्ये २ लाख रूपये दिले़ पैसे दिलेल्या चार वर्षे होऊनही कर्ज प्रकरण मंजूर होऊन वाहन न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे गायकवाड यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी भोसले याच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी पुढील तपास कॉस्टेबल शिरसाठ हे करत आहेत.

Web Title: Two lakh cheating of a woman in a home-business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.