चार पिस्टल अन सहा जिवंत काडतुसांसह दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 12:04 PM2021-03-13T12:04:06+5:302021-03-13T12:05:37+5:30

दोन तरुणांनी विक्रीसाठी आणलेली एक लाख रुपये किंमतीचे चार पिस्टल व सहा जिवंत काडतुसे  पोलीसांनी जप्त करत दोन तरूणांना अटक करण्यात आली आहे.

Two arrested with four pistols and six live cartridges | चार पिस्टल अन सहा जिवंत काडतुसांसह दोघांना अटक

चार पिस्टल अन सहा जिवंत काडतुसांसह दोघांना अटक

Next

जामखेड : दोन तरुणांनी विक्रीसाठी आणलेली एक लाख रुपये किंमतीचे चार पिस्टल व सहा जिवंत काडतुसे  पोलीसांनी जप्त करत दोन तरूणांना अटक करण्यात आली आहे.

शुक्रवारी (दि.१२) रात्री दहाच्या सुमारास जामखेड शहरात राहणारे ऋषी उर्फ पप्पू मोहन जाधव, (वय २२, रा. जामखेड), दीपक अशोक चव्हाण, (वय ३२, रा. तपनेश्वर गल्ली, जामखेड) हे दोन तरूण पिस्टल विक्री करत असल्याची  माहिती पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळाली. त्यांनी सहका-यासह आरोपींच्या घरी छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे  चार पिस्टल व सहा जिवंत काडतुसे आढळून आले. 

ऋषी उर्फ (पप्पू) मोहन जाधव हा विनापरवाना  एक अग्निशस्त्र पिस्टल व २ जिवंत काडतुसे  जवळ बाळगताना  मिळून आला तर दुसरा आरोपी दीपक अशोक चव्हाण  ३ पिस्टल व ४ जीवंत काडतुसे अशी विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या कब्जात बाळगताना मिळून आला.

पोलीस आबासाहेब आत्माराम आवारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस स्टेशनला दाखल केला आहे.  पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आर. व्ही. थोरात  करत  आहेत.

Web Title: Two arrested with four pistols and six live cartridges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.