शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

‘झेडपी’ची सत्ता दोलायमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 23:20 IST

विधानपरिषद निवडणुकीमुळे जिल्हा परिषदेतील सत्ता दोलायमान झाली आहे. सध्या सत्ताधाऱ्यांकडे काठावरील बहुमत असल्याचे स्पष्ट होत आहे.

ठळक मुद्देविधानपरिषद निवडणुकीचा परिणाम : यापुढे सत्तांतर ठरणार अटळ

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विधानपरिषद निवडणुकीमुळे जिल्हा परिषदेतील सत्ता दोलायमान झाली आहे. सध्या सत्ताधाऱ्यांकडे काठावरील बहुमत असल्याचे स्पष्ट होत आहे.मतदारांनी कोणत्याही पक्षाच्या पदरात स्पष्ट बहुमताचे दान न टाकल्याने गेल्यावेळी काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी आणि अपक्षाने मिळून सत्ता प्राप्त केली. त्यावेळी पुसद परिसरातील राष्ट्रवादीच्या सदस्यांनी नाराजीचा सूर आळविला होता. मात्र नेत्यांनी दिलेल्या सुचनेबरहुकम त्यांनी त्यावेळी शांत राहणे पसंत केले. परिणामी काँग्रेसकडे अध्यक्ष व एक सभापती पद, तर भाजपाकडे उपाध्यक्ष आणि एक सभापतीपद आले. राष्ट्रवादी आणि अपक्षाच्या वाट्याला प्रत्येकी एक सभापतीपद आले. गेल्या वर्षभरात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. त्यातूनच राष्ट्रवादीच्या ११ पैकी १० सदस्यांनी थेट गटनेताच बदलविण्याची भूमिका घेतली. त्यात ते यशस्वीही झाले.सत्ता स्थापनेनंतर पहिल्याच सभेपासून काँग्रेसच्या एक सदस्य वारंवार सत्ताविरोधी भूमिका घेताना दिसून येतात. काँग्रेसच्या अनुभवी सभापतींनाही प्रबळ दावेदार असताना अध्यक्षपद नाकारल्यामुळे वणी, मारेगाव परिसरात नाराजीचा सूर आहे. गेल्यावेळी सत्ता स्थापन करताना केवळ अध्यक्ष पदासाठी काँग्रेसमधील माजी मंत्र्यांच्या गटाने पक्षाला चक्क भाजपाच्या दावणीला बांधले. यामुळेही पक्षात नाराजी कायम आहे.आता नुकतीच विधानपरिषदेची बिनविरोध निवडणूक झाली. त्यात पुसदला लॉटरी लागली. तेथील दोन युवकांना भाजप आणि काँग्रेसने आमदारकीची संधी दिली. परिणामी पुसदमध्ये तीन आमदार झाले. या सर्वांवरच आपापल्या पक्षवाढीची जबाबदारी आहे. यातूनच जिल्हा परिषदेतील सत्ता दोलायमान होण्याची शक्यता आहे.राष्ट्रवादीच्या दहा सदस्यांनी गटनेता बदलवून सत्ताधारीविरोधी भूमिका घेतली आहे. काँग्रेसमधील काही सदस्य सुरूवातीपासूनच सत्तेच्या विरोधात दिसून येत आहे. यामुळे सर्वाधिक २० सदस्य असलेल्या शिवसेनाला सोबत घेऊन पुढीलवेळी सत्तांतर अटळ दिसत आहे. प्रभावी पदाधिकाºयांअभावी तूर्तास जिल्हा परिषदेमधील सत्ता दोलायमान दिसून येत आहे.नवीन पदाधिकारी निवडीसाठी दीड वर्षांचा अवधीपुढील पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी केवळ दीड वर्षांचा अवधी बाकी आहे. या दीड वर्षात लोकसभा व विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील चित्र पूर्णपणे पालटण्याची शक्यता आहे. विधानपरिषद निवडणुकीमुळे पुसदला चांगलेच महत्त्व प्राप्त झाले आहे. तेथील तिनही आमदार कोणती भूमिका घेतात, काँग्रेसचे धुरीण पुन्हा पक्षविरोधी भूमिका घेतात का, भाजप नेमके काय करणार आणि पुसदचा बंगला निर्णायक भूमिका घेणार का, यावरच पुढील पदाधिकाºयांची निवड अवलंबून असणार आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदVidhan Parishadविधान परिषद