शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेचा समाजकल्याण विभाग सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 05:00 IST

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. मात्र जिल्ह्याचे मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत सतत नागरिकांची वर्दळ आहे. विविध विभागात कामानिमित्त नागरिक येत आहे. नागरिकांची गर्दी पाहून काही कर्मचारी संघटनांनी अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे गर्दीला आवर घालण्याची मागणी केली होती. तसेच जिल्हा परिषदेच्या वास्तूत प्रवेशद्वारावर सॅनिटायझर व थर्मलगणद्वारे ताप मोजण्याची सुरुवात केली होती.

ठळक मुद्देकोरोना संसर्गाची धास्ती : अधिकारी-कर्मचाऱ्यांची होणार तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेच्या वास्तूत अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे. सोमवारी एका अधिकाºयाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने बुधवारी समाजकल्याण विभागाला टाळे लावण्यात आले.गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. मात्र जिल्ह्याचे मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत सतत नागरिकांची वर्दळ आहे. विविध विभागात कामानिमित्त नागरिक येत आहे. नागरिकांची गर्दी पाहून काही कर्मचारी संघटनांनी अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे गर्दीला आवर घालण्याची मागणी केली होती. तसेच जिल्हा परिषदेच्या वास्तूत प्रवेशद्वारावर सॅनिटायझर व थर्मलगणद्वारे ताप मोजण्याची सुरुवात केली होती. त्या उपरही नागरिकांची वर्दळ सुरूच आहे. जिल्हा परिषदेचे विविध अधिकारी जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार ग्रामीण भागात विविध ठिकाणी कार्यरत आहे. यात समाज कल्याणचे एक वरिष्ठ अधिकारीसुद्धा ग्रामीण भागात सातत्याने दौºयावर होते. त्यांचा कोरोना अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांना उपचारार्थ दाखल करण्यात आले.बुधवारी जिल्हा परिषदेच्या वास्तूतील तळमजल्यावरील समाज कल्याण विभागाला टाळे लावण्यात आले. या विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाºयांची आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली आहे. याशिवाय लगतच्या महिला व बालकल्याण विभागातील अधिकारी व कर्मचाºयांचीसुद्धा येत्या काही दिवसात कोरोना चाचणी घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले. यामुळे जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय वास्तूत कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे. बुधवारी वर्दळीला काही प्रमाणात आळा बसला होता. मात्र काही विभागात नेहमीप्रमाणे गर्दी दिसून येत होती. या गर्दीला आळा न घातल्यास प्रशासकीय इमारतीत कोरोनाचा संसर्ग आणखी वाढण्याची भीती कर्मचाºयांनी व्यक्त केली.२० ऑगस्टला होणार सर्वसाधारण सभा ऑनलाईनकोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे गेल्या वेळी ऑनलाईन सर्वसाधारण सभा घेण्यात आली. आता येत्या २० ऑगस्टला पुन्हा ऑनलाईन सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे. तत्पूर्वी १७ ऑगस्टला जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी शिक्षकांची निवड करण्यासंबंधी सभा आयोजित केली आहे. दरम्यान जिल्हा परिषदेला डॉक्टर असलेले मुख्य कार्यकारी अधिकारी लाभल्याने कोरोना संसर्गावर त्यांनीच मात करण्यासाठी विशेष उपाययोजना आखण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याzpजिल्हा परिषद