कुंभा येथे विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 16:43 IST2020-02-11T16:42:57+5:302020-02-11T16:43:18+5:30

बैलाला पाणी पाजण्यासाठी विहिरीवर गेला असता तोल जाऊन विहिरीत पडल्याने झाला मृत्यू

Young man dies after falling into a well at Kumbha | कुंभा येथे विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू

कुंभा येथे विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू

वणी (यवतमाळ): बैलाला पाणी पाजण्यासाठी विहिरीवर गेला असता तोल जाऊन पाण्यात पडून २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. कुंभा येथे घडली 
सोमवारी सायंकाळी ४ वाजता कुंभा येथील स्वनिल नामदेव महाजन  हा तरुण बैलांना पाणी पाजण्यासाठी शेतात गेला होता.
      बैलांना पाणी पाजत असताना  विहिरीत तोल जाऊन पाण्यात पडला. त्याला पोहणे येत नसल्याने त्याचा घटनास्थळी मृत्यू झाला. संध्याकाळ होऊनही मुलगा घरी परत न आल्याने कुटुंबियानी शोध घेतला असता, शेतातील विहिरीत मृताच्या चपला पाण्यावर तरंग असल्याचे आढळले. याबाबत मारेगाव पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी विहिरीत शोध घेतला असता, विहीरीत मृतदेह आढळून आला. या घटनेचा तपास जमादार भालचंद्र मांडवकर करीत आहेत.

Web Title: Young man dies after falling into a well at Kumbha