शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
6
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
7
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
8
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
9
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
10
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
11
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
12
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
13
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
14
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
15
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
16
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
17
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
18
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
19
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
20
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनीचा गळा चिरुन युवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 06:00 IST

अंकुश उर्फ गोलू भारत चव्हाण (२३) असे या आरोपी तरुणाचे नाव आहे. त्याने गावातील एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग सुरू केला होता. तो सतत तिची छेड काढून प्रेमाची गळ घालत होता. मुलीचा प्रतिसाद न मिळाल्याने शनिवारी सकाळी अंकुशने तिच्या गळ्यावर कटरने वार करून गळा चिरला. त्यानंतर आरोपीने केळझर शिवारातील एका शेतात स्वत:चे हात बांधून विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.

ठळक मुद्देएकतर्फी प्रेमप्रकरण । आर्णी तालुक्यातील नाईकनगरची घटना, विद्यार्थिनीचीही प्रकृती गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : गावात आजीकडे राहणाऱ्या विद्यार्थिनीचा एकतर्फी प्रेमातून गावातीलच युवकाने गळा चिरला. त्यानंतर त्याने शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी आर्णी तालुक्यातील नाईकनगर हेटी येथे घडली.अंकुश उर्फ गोलू भारत चव्हाण (२३) असे या आरोपी तरुणाचे नाव आहे. त्याने गावातील एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग सुरू केला होता. तो सतत तिची छेड काढून प्रेमाची गळ घालत होता. मुलीचा प्रतिसाद न मिळाल्याने शनिवारी सकाळी अंकुशने तिच्या गळ्यावर कटरने वार करून गळा चिरला. त्यानंतर आरोपीने केळझर शिवारातील एका शेतात स्वत:चे हात बांधून विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. विद्यार्थिनी घरात एकटी असताना संधी साधून अंकुशने तिच्यावर हल्ला केला व तो तेथून पळून गेला. त्या विद्यार्थिनीने जीव वाचविण्यासाठी आरडाओरडा केल्यानंतर शेजारी राहणारी काकू धावून आली. तेव्हा रक्ताच्या थारोळ्यात ती मुलगी पडून होती. तिला तातडीने उचलून गावातील नीलेश राठोड, विजय जाधव या तरुणांनी उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविले. प्रकृती गंभीर असल्याने तिला थेट यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.मुलीची प्रकृती गंभीर आहे. तिच्यावर तातडीने काही शस्त्रक्रियाही करण्यात आल्या. मात्र प्रकृती धोक्यात असल्याचे वैद्यकीय सूत्राकडून सांगण्यात आले.या प्रकरणी मुलीच्या काकाने दिलेल्या तक्रारीवरून आर्णी पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमान्वये आरोपी अंकुश चव्हाण याच्यावर गुन्हे दाखल केले. दरम्यान पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह केळझर शिवारातील शेतातील विहिरीत तरंगताना दिसला. यावरून त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले.मुलीचे आई-वडील होते पुण्यातमुलीचे आई-वडील पुणे येथे पेंटींगचे काम करीत होते. मागील काही महिन्यांपासून शिक्षणाच्या दृष्टीने ही मुलगी आजीसोबत गावात राहत होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू